BSNL ने लाँच केली Cinema Plus Service; 129 रुपयांमध्ये मिळेल Zee5 आणि SonyLIV चा Free Access
BSNL (Photo Credit: Livemint)

BSNL Cinema Plus service: सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने आपल्या वापरकर्त्यांना आनंद देण्यासाठी खास सेवा सुरू केली आहे. कंपनीने यावेळी ग्राहकांसाठी Cinema Plus Service आणली आहे. या सेवेअंतर्गत वापरकर्त्यांना बर्‍याच ओटीटी अ‍ॅप्सचे फ्री सबस्क्रिप्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला केवळ 129 रुपये द्यावे लागतील. या सेवेसाठी बीएसएनएलने YuppTV सह भागीदारी केली आहे.

OnlyTech च्या वृत्तानुसार, बीएसएनएलने YuppTV च्या भागीदारीत सिनेमा प्लस सेवा सुरू केली आहे. या सेवेमध्ये, ग्राहकांना SonyLIV Special, Voot Select, Yupp TV प्रीमियम आणि Zee5 प्रीमियमप्रवेश मिळेल. खास गोष्ट म्हणजे Yupp टीव्ही सबस्क्रिप्शनच्या मदतीने, वापरकर्ते एकाच सबस्क्रिप्शन अंतर्गत अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतात.

बीएसएनएलच्या Cinema Plus सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी सुरुवातीला 129 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर तीन महिन्यांनंतर तुम्हाला दरमहा 199 रुपये द्यावे लागतील. या योजनेत वापरकर्त्यांना एकाधिक ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि 300 हून अधिक टीव्ही चॅनेलमध्ये प्रवेश मिळेल. यात संगीत, चित्रपट, खेळ आणि किड्स कंटेंटचा समावेश आहे. तसेच, वापरकर्ते झी 5 आणि वूटवर मूळ शो आणि थेट टीव्ही चॅनेल पाहण्यास सक्षम असतील. (वाचा - Reliance Jio चा धमाकेदार वार्षिक प्लान! 2599 रुपयात मिळणार 740GB डेटा)

बीएसएनएल सिनेमा प्लसची सदस्यता घेण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. जेथे आपले टेलिकॉम सर्कल निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा नंबर, ईमेल आयडी आणि नाव टाकावे लागेल. एकदा साइन अप झाल्यानंतर ही सेवा Android, आयफोन, अँड्रॉइड टीव्ही आणि फायर टीव्हीवर उपलब्ध होईल. विशेष म्हणजे वापरकर्ते डेस्कटॉप आणि लॅपटॉपच्या माध्यमातूनही सहजपणे या सेवेत प्रवेश करू शकतात.