BSNL कंपनीचा धमाकेदार प्लॅन, युजर्सला एका वर्षासाठी मिळणार 1095GB डेटा
BSNL (Photo Credit: Livemint)

राज्यातील टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनच्या दरात वाढ केल्याने युजर्स निराश आहेत. मात्र कंपनीकडून आता याच युजर्सला आकर्षित करण्यासाठी प्लॅनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला बीएसएनएल त्यांचे जुने प्लऐन सुद्धा खासगी कंपन्यांना टक्कर देत आहे. मात्र आता बीएसएनएल त्यांच्या युजर्सला काही अनलिमिटेड बेनिफिट्स असलेले प्लॅन उपलब्ध करुन देत आहे. याची सुरुवात 108 रुपयांपासून असून सर्वात महाग प्लॅन 1999 रुपयांचा आहे. बीएसएनएनलच्या 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. मात्र ही ऑफर 31 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे.

बीएसएनएल या कंपनीचे देशात मोठ्या प्रमाणात युजर्स आहे. त्यामुळे युजर्सची संख्या अधिकाधिक वाढण्यासाठी काही आकर्षक प्लॅन उपलब्ध करुन देत आहेत. याचा थेट फायदा युजर्सला होत आहे. त्यामुळे ते जुन्या प्लॅनमधीलच काही बेस्ट प्लॅन खरेदी करत आहेत. कंपनीबाबत बोलायचे झाल्यास 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये यामध्ये एकूण 1095 जीबी डेटा युजर्सला वर्षभरासाठी दिला जाणार आहे. तसेच 250 मिनिटांपर्यंत डेली अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा देण्यात येणार आहे. या नव्या ऑफरमध्ये युजर्सला वर्षभराच्या प्लॅनमध्ये 1 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे.(Reliance JioFiber युजर्सला झटका, 90 टक्क्यांपर्यंत इंटरनेटच्या स्पीडमध्ये घट) 

कंपनीने नुकत्याच चैन्नई, तमिळनाडू येथे 1999 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे. 365 दिवसांच्या या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन वर्षभरासाठी असणार असून त्यामध्ये युजर्सला SonyLIV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्याचसोबत 100 फ्री एसएमएस आणि कॉलिंगची सेवा सुद्धा देण्यात येणार आहे.