BSNL ने 1999 रुपयांच्या वार्षिक प्लान मध्ये केला मोठा बदल, जाणून घ्या सविस्तर
BSNL (Photo Credit: Livemint)

सरकारी टेलिकॉम कंपनी (Telecom Company) बीएसएनएलने (BSNL) आपल्या वार्षिक प्लानमध्ये एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे ही बातमी बीएसएनएल युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बीएसएनएल ग्राहकांनी आपल्या 1999 रुपयांच्या वार्षिक प्लानमध्ये एक मोठा बदल केला आहे. याआधीही त्यांनी आपल्या या प्लानमध्ये बदल केला होता. या प्लानमध्ये आधी दर दिवसा 3GB डेटा मिळत होता. मात्र आता या प्लानमध्ये दरदिवसा केवळ 2GB डेटा मिळणार आहे. याचा अर्थ बीएसएनएलने त्याच्या इंटरनेट डेटा (Internet Data) बेनिफिट कमी केले आहे.

बीएसएनएलच्या 1999 रुपयांच्या वार्षिक प्लानची वैधता 365 दिवसांची मिळणार आहे. तसेच त्याचे अन्य बेनिफिट्स देखील तेच असणार आहेत. केवळ या प्लानमध्ये 3GB डेटा ऐवजी 2GB डेटा दर दिवसा मिळणार आहे. या व्यतिरिक्त अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, लोकल-एसटीडी कॉल्सची सुविधा कायम राहणार आहे. तसेच या प्लानमध्ये दर दिवसा 100 मोफत एसएमएस पाठविण्याची सुविधा मिळणार आहे.हेदेखील वाचा- Reliance Jio च्या 'या' प्लॅनवर दिला जातोय 168GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल

त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून बीएसएनएलच्या PV 1999 मल्टिपल रिचार्जची सुविधा परत घेण्याची घोषणा केली आहे. सध्या या प्लानमध्ये कंपनी 21 दिवसांची वैधता ऑफर करीत आहे. म्हणजेच आता 1999 रुपयांच्या प्लानला रिचार्ज केल्यास ग्राहकांना 386 दिवसांची वैधता मिळते.मात्र 1 फेब्रुवारीपासून रिचार्ज केल्यास 365 दिवसांची वैधता मिळणार आहे. याआधी डिसेंबर 2020 मध्ये BSNL ने 1999 रुपयांच्या OTT सब्सक्रिप्शनमध्ये बदल केले होते.

दरम्यान टेलिकॉम कंपनी एअरटेल ने आपल्या युजर्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. एअरटेल आपली 5G इंटरनेट सेवा लाईव केली आहे. यामुळे आता इंटरनेटचा स्पीड आणखी दुप्पट होणार आहे. थोडक्यात आता एअरटेलची 5G इंटरनेट सेवा सुसाट धावणार असं म्हणायला हरकत नाही. नुकताच एअरटेल कंपनीने आपल्या युट्यूब पेज याचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. Airtel 5G सर्विस हैदराबादमध्ये कर्मशियली लाइव केली आहे. कंपनीच्या CEO चे म्हणणे आहे की, स्पेक्ट्रम अलॉटमेंटसह Airtel 5G सर्विस सुरु केली जाऊ शकते.