Reliance Jio च्या 'या' प्लॅनवर दिला जातोय 168GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल
Reliance Jio (Photo Credits: Twitter)

टेलिकॉम मधील दिग्गज कंपनी Reliance Jio आपल्या युजर्ससाठी नेहमीच ऑफर घेऊन येत असते. त्याचसोबत जिओकडे प्रत्येक बजेट सेगमेंट मधील बेस्ट प्लॅन असून त्यात डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुद्धा सुविधा दिली जाते. याच दरम्यान आम्ही आज तुम्हाला जिओ कंपनीच्या 599 रुपयांच्या प्लॅन बद्दल सांगणार आहोत. हा प्लॅन प्री पेड आणि पोस्टपेड रुपात उपलब्ध आहे. परंतु प्री पेड प्लॅनसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे.(WhatsApp वर यूजर्स चॅटिंग सोबतचं ऑर्डर करू शकतात वस्तू; Reliance आखत आहे 'ही' नवी योजना)

Reliance Jio च्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला प्रति दिन 2GB डेटा दिला जाणार आहे. हा प्लॅन 84 दिवसांच्या वॅलिडिटीसह येणार आहे. त्यामुळे वॅलिडिटी दरम्यान युजर्सला एकूण 168GB हाय स्पीड डेटाचा लाभ घेता येणार आहे. डेली हाय स्पीड डेटाची लिमिट संपल्यानंतर त्याची स्पीड कमी होत 64kbps होणार आहे.तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये डेटाच्या व्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळणार आहे. यामध्ये 100 डेली एसएमएस ही दिले जाणार असून जिओ अॅप्सचे फ्री मध्ये सब्सक्रिप्शन ही मिळणार आहे.(Mobile Recharge: 300 रुपयांहून कमी किंमती मधील 'या' शानदार Prepaid Plans बद्दल येथे अधिक जाणून घ्या)

याआधी रिलायंस जिओ कडून एक मोठी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार,  रिलायंस जिओच्या ग्राहकांना आता 1 जानेवारी 2021 पासून सार्‍या इतर टेलिकॉम कंपन्यांच्या नेटवर्कवर मोफत व्हॉईस कॉल दिले जाणार असल्याचे म्हटले होते. त्याचसोबत रिलायंसच्या ग्राहकांसाठी ऑन नेट डोमेस्टिक व्हॉईस कॉल्स हे जिओ नेटवर्कवर यापूर्वीपासूनच फ्री होते.