खुशखबर! आता BSNL एसएमएसवरही देणार 6 पैशांचा कॅशबॅक
BSNL (Photo Credit: Livemint)

व्होडाफोन- आयडिया (Vodafone-Idea) आणि एअरटेल (Airtel) कंपनीने टॅरिफ शुल्क (Tariff Rate) वाढण्याचे जाहीर केले होते. दोन दिवसांपूर्वी लोकप्रिय रिलायन्स जिओने (Reliance Jio) देखील त्यांच्या टॅरिफ शुल्कच्या दरात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मात्र, बीएसएनएलने टॅरिफ शुल्कामध्ये कोणतीही दरवाढ करणार नसल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी स्पेशल कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) सुरू केली आहे. आता बीएसएनएल एसएमएस (SMS) केल्यानंतरही कॅशबॅक देणार आहे. (हेही वाचा - ग्राहकांना मोठा धक्का; व्होडाफोन-आयडिया, एअरटेल कपंनीनंतर जिओने घेतला 'हा' मोठा निर्णय)

बीएसएनएलने मागच्या महिन्यात कॉलिंग केल्यावर मिनिटाला 6 पैशांचा कॅशबॅक देण्याची योजना लाँच केली होती. बीएसएनएलने आता या योजनेत आणखी वाढ केली आहे. त्यामुळे आता बीएसएनएलच्या सीमवरून एसएमएस केल्यानंतरही 6 पैशांचा कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी आपल्याला ACT 6 paisa असा मॅसेज टाईप करून 9478053334 या नंबरवर पाठवावा लागणार आहे. ही खास ऑफर 31 डिसेंबरपर्यंत असून BSNL वायरलाइन, ब्रॉडबँड आणि फायबर टू द होमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे.

हेही वाचा - BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! 'या' प्लानमध्ये मिळणार दिवसाला 2 जीबी डेटा

सध्या अनेक कंपन्यांनी आपल्या टॅरिफ शुल्कात वाढ केली आहे. मात्र, बीएसएनएलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही खास ऑफर लाँच केली आहे. त्यामुळे बीएसएनएल ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. या ऑफरचा जास्तीत-जास्त फायदा ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार आहे.