BSNL (Photo Credit: Livemint)

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने व्यवसाय वृद्धीच्या अनुषंगाने नवनवीन प्लॅन्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांच्या वापराचे सर्वेसखान करून हे प्लान डिझाईन करण्यात आले असल्याने यातून ग्राहकांचा अधिक फायदा व कंपनीला नफा असा दुहेरी हेतू साध्य करण्यावर भर आहे. प्रीपेड प्लानच्या (Prepaid Plans) वापरात ग्राहक जर का कोणती बाब लक्षात घेत असेल तर ती म्हणजे डेटा पॅकेज. यामुळेच बीएसएनएल तर्फे आता एका असा किफायतशीर प्लॅन लाँच करण्यात आला आहे ज्यानुसार ग्राहकांना प्रति दोन 2 जीबी पर्यंत डेटा वापरता येणार आहे. या आकर्षक प्लान्सद्वारे ग्राहकांना बेस्ट डील ऑफर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. (सरकार फ्री कॉलिंग आणि डेटा सर्विस बंद करण्याची शक्यता)

प्राप्त माहितीनुसार, या प्लान साठी ग्राहकांना बीएसएनएल कंपनीचे 998 रुपयांचं एक डेटा स्पेशल टॅरिफ वाऊचर मिळणार आहे. यात दररोज 2 जीबी डेटा ऑफर करण्यात आला आहे. ज्यानुसार, 210 दिवसांच्या प्लान अवधीत आपल्याला दुप्पट म्हणजेच 420 जीबी डेटा वापरता येणार आहे. हा प्लान सुरु करताच यूजर्सना सुरुवातीचे दोन महिने पर्सनलाइज्ड रिंग बॅक टोन बेनिफिट पुरवला जाणार आहे. सध्या हा प्लान केवळ केरळ राज्यात उपलब्ध आहे.

दरम्यान, बीएसएनएलचा हा प्लान एसटीव्ही असल्याने यामध्ये फ्री कॉलिंग किंवा SMS सुविधांचा लाभ घेता येणार नाही. याशिवाय अलीकडेच बीएसएनएलने एक 997 रुपयांचा कॉम्बो प्लान लाँच करण्यात आला होता ज्यात 250 मिनिटांच्या कॅपिंग सोबतच अनलिमिटेड कॉलिंग, प्रति दिन 3 जीबी डेटा आणि 100 एसएमएस असे पॅकेज मिळणार होते . या प्लानची व्हॅलिडिटी 180 दिवसांची आहे.