Amazon Summer Sale 2022: 4 ते 8 मे दरम्यान चालणार ॲमेझॉनचा समर सेल; स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती उपकरणांवर बंपर ऑफर
Amazon (PCc - Pixabay)

Amazon India ने घोषणा केल्याप्रमाणे आजपासून, म्हणजेच 4 मे पासून कंपनीचा समर सेल (Amazon Summer Sale) सुरू झाला आहे. हा सेल 8 मे पर्यंत चालणार आहे. याचा अर्थ तुम्ही या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफरचा लाभ पूर्ण 4 दिवस घेऊ शकता. या सेल दरम्यान, ग्राहकांना स्मार्टफोन, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या गोष्टींवर बंपर ऑफर देण्यात आल्या आहेत. लोक आयसीआयसीआय बँक, कोटक आणि आरबीएल क्रेडिट/डेबिट कार्डसह खरेदी करून नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर तसेच 10% इंस्टंट बँक डिस्काउंट प्राप्त करू शकतात.

Amazon समर सेल दरम्यान, तुम्हाला टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर 50% पर्यंत सूट दिली जात आहे. याचा अर्थ असा की तुम्ही टीव्ही, एसी, एअर कूलर आणि मोठी उपकरणे निम्म्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. जर तुम्ही पहिल्यांदा खरेदी करत असाल तर तुम्हाला तुमच्या पहिल्या ऑर्डरवर रु.100 चा कॅशबॅक देखील मिळेल. याशिवाय Amazon India ने तुमच्यासाठी अतिशय सुलभ रिटर्न पॉलिसी देखील ठेवली आहे. एवढेच नाही तर तुम्ही HOM200 कूपन कोड वापरून खरेदी केल्यास तुम्हाला सुमारे 10 टक्के म्हणजेच 200 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

या सेलमध्ये मोबाइल अॅक्सेसरीजवर 40% पर्यंत सूट मिळत आहे. Oppo आणि Xiaomi फोनवर बंपर ऑफर आहे. iPhone 13 वर रु. 8,000 पर्यंत सूट मिळत आहे,  OnePlus 9 सिरीजवर रु. 12,000 पर्यंत आणि Samsung Galaxy M-Series फोनवर 5,000 रुपयांची सूट मिळू शकते. स्मार्टफोनवरील डील्सव्यतिरिक्त, Amazon समर सेलमध्ये टीव्ही, घर आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांवरही चांगली ऑफर मिळत आहे. (हेही वाचा: FIR Against Amazon: ॲमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची नियमबाह्य पद्धतीने विक्री; अन्न व औषध प्रशासनाने दाखल केला गुन्हा)

लिव्हप्युअर वॉटर प्युरिफायर 55% च्या सवलतीत सेलमध्ये उपलब्ध आहे. या आरओमध्ये 6 लेव्हल वॉटर फिल्टर आहे. त्याची किंमत 15,990 रुपये आहे परंतु ऑफरमध्ये तुम्ही तो 7,199 रुपयांना खरेदी करू शकता. यासह रीच एअर बाईक व्यायाम सायकल विक्रीमध्ये 50% पर्यंत सवलतीने उपलब्ध आहे आणि तुम्ही ही 12 हजारांची सायकल 6,459 रुपयांना खरेदी करू शकता.

(Disclaimer: ही सर्व माहिती Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon शी संपर्क साधावा लागेल. लेटेस्टली मराठी येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही)