Airtel (Photo Credits: File Photo)

एअरटेल कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी खुशखबर आणली आहे. तर कंपनीने अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी लागू केलेले FUP चार्ज हटवले आहेत. त्यामुळे आता युजर्सला दुसऱ्या नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंग करता येणार आहे. एअरटेलकडून 3 डिसेंबर पासून त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये बदल करत त्यांच्या किंमती सुद्धा वाढवल्या होत्या. त्यानुसार अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी प्रति मिनिटांसाठी 6 रुपये वसूल केले जाणार होते. मात्र कंपनीने आता एक ट्वीट करत आजपासून भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करण्याची मुभा दिली आहे.

एअरटेलने शुक्रवारी रात्री उशिरा ट्वीट करत असे म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांचे मत जाणून घेतले त्यामुळेच आम्ही आमच्या प्लॅनमध्ये काहीसा बदल करत आहोत. आमच्या अनलिमिटेड प्लॅनसह भारतातील अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणताही शुल्क वसूल केला जाणार नाही आहे.(टेलिकॉम कंपन्यांचे 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत बेस्ट प्रीपेड प्लॅन, जाणून घ्या)

Airtel India Tweet: 

त्याचसोबत एअरटेल कंपनीचा 148 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला 28 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. तसेच एकूण 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स (अन्य नेटवर्कवर कॉलिंग) मिळणार आहेत. तसेच वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्लॅन हा सर्वात स्वस्त असून ग्राहकाला 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स मिळणार आहेत. रिलायन्स जिओचा 129 रुपयांच्या प्लॅन घेतल्यास यामध्ये 2 जीबी डेटा आणि 1000 एफयुपी मिनिट्स देण्यात येणार आहेत. त्याचसोबत एअरटेलचा 148 आणि वोडाफोनचा 149 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनपेक्षा ग्राहकांना जिओचा हा प्लॅन घेतल्यास 15 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.