Aarogya Setu app | (Photo Credits: Twitter)

Aarogya Setu New Feature: आरोग्य सेतु अॅपकडून युजर्सला सुविधा देण्यासाठी सातत्याने नवे अपडेट आणले जात आहेत. अशातच आणखी एक नवीन अपडेट आरोग्य सेतू अॅपसाठी आणले आहे. याच्या माध्यमातून युजर्सला स्वत: आपले स्टेट्स अपडेट करता येणार आहे. याआधी पर्यंत लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर ऑटोमॅटिक पद्धतीने स्टेटस अपडेट केले जात होते. त्यामुळे काही वेळेस उशिराने स्टेटस अपडेट झाल्याची सुचना मिळत आहे. अशातच सरकारकडून युजर्सला स्वत: आरोग्य सेतू अॅपवर स्टेट्स अपडेट करण्याचे ऑप्शन उपलब्ध करण्यात आले आहे. अशातच आरोग्य सेतू अॅपवर लसीकरणानंतर आता वेरिफिकेशन करणे अनिवार्य असणार आहे.

आरोग्य सेतूच्या नव्या अपडेटनंतर कोणत्याही व्यक्तीला आपल्या लसीकरणाच्या स्थिती बद्दल स्वत:ला स्वमूल्यांकन करता येणार आहे. सरकारच्या मते, यामुळे लसीकरणाच्या आकडेवारीबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे. त्याचसोबत वेळेवर स्टेटस अपडेट सुद्धा केले जाऊ शकणार आहे.(Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक ग्राहक DigiLocker च्या माथ्यमातून अद्ययावत करु शकतात आपला पत्रव्यवहाराचा पत्ता)

-'या' पद्धतीने करा स्टेट्स अपडेट

>जर तुम्ही लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतला असाल तर तो वेरिफाय करावा लागणार आहे.

>यासाठी अॅपवर Partially Vaccinated (Unverified) किंवा Vaccinated (Unverified) वर क्लिक करावे लागणार आहे.

-त्यानंतर आरोग्य सेतू अॅपवर मोबाइल क्रमांक अपडेट करावा लागेल. आता Proceed to Verify वर क्लिक करावे लागणार आहे.

-रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर ओटीपी भरावा लागणार आहे.

-आता आपले डिटेल्स जसे नाव आणि माहिती द्यावी लागणार आहे.

-आता Confirm करावे लागेल.

आरोग्य सेतू अॅपच्या स्टेटस अपडेटनंतर अॅपच्या होम पेजवर एक ब्लू शील्ड दिसणार आहे. ज्या लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे त्यांना स्टेटसवर सिंगल ब्लू टिक दिसणार आहे. तर लसीचे दोन्ही डोस मिळाल्यानंतर त्यांना डबल टिक दिसणार आहे. दरम्यान. आरोग्य सेतु अॅपवर डबल ब्लू टिक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवसानंतर दिसणार आहे.