कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक सेवा घेऊन आली आहे. या बँकेचे ग्राहक डिजिलॉकर (DigiLocker) च्या माध्यमातून आपला पत्रव्यवहाराचा पत्ता अद्ययावत करु शकतात. मात्र, त्यासाठी कोटक महिंद्रा बँक (KMBL) ग्राहकांना नेट बँकींगचा वापर करावा लागणार आहे. केएमबीएल ने डिजिलॉकर सोबतच आपल्या नेट बँकींग मंचाचे एकीकरणही पूर्ण केले आहे. कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की, अेक ग्राहक कोरोना व्हायरस महामारीमुळे आपल्या मूळ गावी स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे ही सेवा आमच्या स्थलांतरीत झालेल्या ग्राहकांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देते. या माध्यमातून आमचे ग्राहक नेट बँकींगचा वापर करत तातडीने आपला पत्रव्यवहाराचा पत्ता ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे बदलू शकतात.
कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष (उत्पादन, पर्यायी व्यवस्था आणि ग्राहक तक्रारनिवारण) पूनीत कपूर यांनी म्हटले की, कोटकमध्ये आमचे सर्व लक्ष्य हे पाहण्यावर आहे की, आम्ही आमच्या ग्राहकांना डिजिटल मंच कसा उपलब्ध करु देऊ शकतो. ज्यामुळे ग्राहकांना बँकींग व्यवहार सुलभ आणि समस्या मूक्त पद्धतीने करता येतील. डिजिलॉकरसोबतच एकीकरण दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. जे कोटक ग्राहकांना आपल्या पत्रव्यवहाराच्या पत्त्याला ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे बदलू शकतात. त्यासाठी कोणत्याही कागदोपत्री पूर्ततेची आवश्यकता नाही.
डिजिलॉकर भारत सरकारच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून टाकलेले पहिले पाऊल आहे. ज्याचा उद्देश आहे की, नागरिकांना कागदविरहीत सेवा प्रदान करणे. ( हेही वाचा, Shivajirao Bhosale Sahakari Bank: पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द)
दरम्यान, कोरोना व्हायरस महमारी संकटामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. या स्थलांतरामुळे नागरिकांच्या गरजा मोठ्या प्रमाणावर बदलल्या. इतकेच नव्हे तर नागरिकांचे प्राधान्यक्रमही बदलले. शहरातून खेड्याकडे आणि खेड्यातून शहरांकडे असे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने बँकांच्या ग्राहकांंमध्येही मोठा बदल झाला आहे. काही ठिकाणी बँकेचा खातेदार नव्या ठिकाणी निवासास गेल्याने त्यांना बँकेसोबत पत्रव्यवहार करण्यास अडचण येत होती. त्यामुळे बँकेने हा पर्याय उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.