आयसीसीकडून क्रिकेटच्या 'या' नियमात बदल; कोणत्याही संघावर आता होणार नाही अन्याय!
World Champion Team England. (Photo Credits: Getty Images)

इंग्लंडच्या (England) संघाने विश्वचषक स्पर्धेत (World Cup Championship) उत्कृष्ट अशी कामगिरी करुन २०१९ च्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. इंग्लंड आणि न्युझीलंड (NewZeaLand) यांच्या हा अंतिम सामना रंगला होता. तसेच हा सामना बरोबरीत सुटला असून या सामन्यात सर्वाधिक चौकार ठोकल्यामुळे इंग्लंडच्या संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकटे समितीच्या नियमावर (International Cricket Commitee) अनेकांनी टीका केली होती.

अनिल कुंबळे (Anil Kumble) यांच्या अध्यक्षतेखाली आंतराष्ट्रीय क्रिकेट समितीने केलेल्या शिफारसीनंतर मुख्य कार्यकारी समितीने सोमवारी मान्य केले की, आयसीसी स्पर्धांमध्ये निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हरचा वापर कायम ठेवला जाईल. आयसीसी आणि सीईसी दोघांनीही हे मान्य केले की, हा बदल खेळासाठी एक रोमांचक आणि आकर्षक वातावरण निर्माण करेल, अशी आशा व्यक्त केली आहे. एकदिवसीय आणि टी -२० विश्वचषक स्पर्धेतील सेमीफाइनल आणि फायनल सामन्यात हा नियम लागू करण्यात आले आहे. परंतु, हा नवा नियम कोणत्या सामन्यापासून लागू करण्यात येणार आहे, अद्याप काहीच ठरवण्यात आले नाही.

सोमवारी दुबईमध्ये आयसीसी बोर्डाच्या बैठकीत झिम्बाब्वे आणि नेपाळ यांना आयसीसीच्या सदस्य म्हणून सज्ज करण्यात आले आहे. नेपाळने आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे २०१६ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. नेपाळच्या क्रिकेट असोसिएशनच्या 17 सदस्यीय केंद्रीय कार्यकारी समितीची निवडणूक या महिन्याच्या सुरूवातीस पूर्ण झाली आहे. दरम्यान क्रिकेटच्या वादग्रस्त नियमात बदल करण्यात आला आहे. विश्वचषकातील साकळी सामन्यात सामना बरोबरीत सुटला तर, हा सामना सुपर ओव्हर खेळले जाणार. परंतु, सामना सुपर ओव्हरमध्ये बरोबरीत सुटला तर, तो सामना टाई केला जाईल. मात्र, विश्वचषकातील सेमीफायनल आणि फाइनल सामना सुपर ओव्हरमध्ये देखील टाय झाल्यास चौकारच्या जोरावर संघाला विजयी घोषीत करण्यात येणार नाही. जो पर्यंत सामन्यात निश्चित निकाल लागणार नाही, तो पर्यंत दोन्ही संघात झुंज होत राहणार, असा निर्णय घेण्यात आला आहे. हे देखील वाचा- बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड?

आयसीसीच्या भविष्यातील प्रशासकीय संरचनेचा विचार करण्यासाठी गव्हर्नन्स वर्किंग गटाच्या स्थापनेस मंडळाने मान्यता दिली. या संघाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलियाच्या अर्ल एडिंग्ज यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असून त्यामध्ये ग्रेग बार्कले (न्यूझीलंड), टोनी ब्रायन (स्कॉटलंड), एहसान मणी (पाकिस्तान), ख्रिस नेन्झानी (दक्षिण आफ्रिका) आणि रिकी स्कर्ट (वेस्ट इंडीज)) उपस्थित असणार आहेत.