बीसीसीआयच्या अध्यक्षपदी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची निवड?
Sourav Ganguly (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Gangully) यांची बीसीसीआयचे (BCCI) नवे अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ गांगुली यांच्यासह ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) यांनीही अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. परंतु, यात सौरव गांगुला यांचा पारडा जड असल्याचे दिसत आहे. तसेच बीसीसीआयच्या सचिवपदी भारतीय केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे सपुत्र जयेश शाह (Jayesh Shah) यांचे नाव समोर आले आहे. त्याचबरोबर अरुण धुमाळ (Arun Dhumal) हे बीसीसीआयचे नवे खजिनदार असणार आहेत, अशी चर्चा रंगली आहे. धुमाळ हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचे सपुत्र आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी अखेरचा दिवस आहे परंतु आठवड्यात होणार्‍या लॉबींग व व्यस्त संमेलनांनंतर सर्व उमेदवार बिनविरोध उभे झाल्यामुळे कोणतीही निवडणूक होणार नाही.सध्या क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष असलेले 47 वर्षीय गांगुली यांना सप्टेंबर 2020 मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी सोडावी लागणार आहे.बीसीसीआयच्या ऑक्टोबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, या दृष्टीने रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. या बैठकीत विविध नावांवर चर्चा झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय यांना सचिवपद आणि केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण सिंग धुमाळ यांच्या नावांबाबत संघटकांचे एकमत झाले आहे. जय हे गुजरात क्रिकेट संघटनेचे आणि अरुण सिंग हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत. आसामच्या देबाजित सैकिया यांना संयुक्त सचिवपदासाठी उमेदवारी दिली जाणार आहे. देखील वाचा- IND vs SA 2nd Test 2019: भारत-दक्षिण आफ्रिका दुसरा टेस्ट सामना ठरला ऐतिहासिक, फक्त चार दिवसांमध्ये बनले इतके रेकॉर्ड, वाचा सविस्तर

अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाबाबत रात्री उशिरापर्यंत एकमत होऊ शकले नाही. गांगुली यांना लोढा समितीच्या नियमानुसार कार्यकाळाचा मुद्दा येत्या काही काळात अडचणीचा ठरू शकतो. भारताचे माजी कर्णधार पद भुषवलेले सौरव गांगुली यांनी अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीचे अजूनही कौतुक केले जात आहे.