
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) 2020 मध्ये यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघ गुरुवारी 5 मार्च रोजी सेमीफायनल सामना खेळणार आह, परंतु त्याआधी कांगारू संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन संघाची स्टार अष्टपैलू एलिस पेरी (Elysse Perry) आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपच्या उर्वरित सामन्यातून बाहेर झाली आहे, जो यजमान संघासाठी सर्वात मोठी समस्या आहे. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध लीग फेरीतील अंतिम सामन्यात पेरीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. न्यूझीलंडच्या एका महिला फलंदाजाला धाव प्रयत्नात तिच्या डाव्या पायाचे स्नायूमध्ये ताण आला, ज्यामुळे तिला मॅचमधूनच मैदानाबाहेर जावे लागले. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियाद्वारे पेरी उर्वरित सामन्यात भाग घेणार नसल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलियन फिजिओ पिप इंगे (Pip Inge) यांनी असे म्हटले आहे की पेरीच्या डाव्या पायाच्या स्नायूवरती ताण आला आहे. तिची दुखापत उच्च दर्जाची आहे. (Women's T20 World Cup 2020: ऑस्ट्रेलियाचा महिला टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश, न्यूझीलंडचा गेम ओवर)
विश्वचषकनंतर देखील पेरी या महिन्याच्या शेवटी दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. सोमवारी न्यूझीलंडविरुद्ध करो किंवा मारोच्या सामन्यात गतजेत्या ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम 4 मध्ये स्थान निश्चित केले. "आम्ही सध्या व्यवस्थापनाचे पर्याय शोधत आहोत आणि तिच्या पुनर्प्राप्तीद्वारे एलिसला पाठिंबा देत राहू," इंगे यांनी माध्यम निवेदनात म्हटले.
29 वर्षीय एलीसने 2009 पासून ऑस्ट्रेलिया संघासाठी वर्ल्ड कपच्या सर्व सामन्यांमध्ये झळकली आहे. पेरी बॅट आणि बॉलने प्रभावी खेळ करण्यासाठी शक्षम आहे. इतकंच नाही, न्यूझीलंडविरुद्ध तिने 15 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 21 धावा केल्या. भारताविरुद्ध स्पर्धांतील पहिला सामना गमावल्यावर ऑस्ट्रेलियाने गट ‘ए’ मधील उर्वरित तीन सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले आणि सेमीफायनल फेरी गाठली. ऑस्ट्रेलियापूर्वी भारत, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांनीही गुरुवारी उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळविली आहे. सेमीफायनल सामना सिडनी क्रिकेट मैदानावर 5 मार्च रोजी खेळला जाईल.