व्हिडिओ: चंद्र होता साक्षीला, चांदणी रात्र आणि विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत निसर्गाच्या सानिध्यात
Virat Kohli With Anushka on full Moon Night | (Photo courtesy: archived, edited images)

Virat Kohli With Anushka on full Moon Night: कामगिरी मैदानावरील असो की, मैदानाबाहेरची भारतीय क्रिकेट संघाच कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) नेहमीच चर्चेत असतो. विराट कोहलीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, तो अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधतो. मग ते एखाद्या गाण्यावर केलेला डान्स असो किंवा रॉडर फेडररसोबत मैदानावर मारलेल्या गप्पा असो. विराटचं सगळंच कसं वेगळ असतं. विराटचा असाच एक किस्सा सध्या भलताच चर्चेत आहे. त्याच्या चाहत्यांनी या प्रसंगाचे जोरदार कौतुक केले आहे. पत्नी अनुष्का (Anushka Sharma) हिच्यासोबत विराटने चांदण्या रात्रीत चालण्याचा अनुभव घेतला. त्यांचा हा रोमॅंटीक अंदाज म्हणजे जणू 'चंद्र होता साक्षीला' असाच होता. या प्रसंगाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओत दिसते की, विराट कोहली न्युझीलंडमध्ये आपली पत्नी अनुष्कासबत चांदण्या रात्री पाई चालत निसर्गसौदर्याचा आनंद घेत आहे. स्काई स्पोर्ट्सला विराटने दिलेल्या मुलाखतीमध्ये तो सांगतो की, 'मला आणि माझ्या पत्नीला अनेक गोष्टी करायला आवडतात. आम्हाला लॉग वॉकला जायलाही आवडते.' पुढे बोलताना तो सांगतो की, 'जर आम्ही नेपियरसारख्या जागी आहोत. जी इतकी सुंदर आहे की, एका रात्री आम्ही मरीन परेडला गेलो. तिथे एका बाकड्यावर बसून आम्ही चांदण्या रात्रीची मजा घेतली. तेथे आम्ही खूप गप्पा मारल्या.' त्याने सांगितले की, 'आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला फार मजा वाटते. कारण आमच्यावर नेहमीच लोकांचे लक्ष असते. त्यामुळे आम्हाला असे निसर्गाच्या सानिध्यात भेटायला खपच कमी वेळ मिळतो. त्यामुळे आम्ही मिळालेल्या वेळेचा पुरेपूर आनंद घेतो.' (हेही वाचा, रोहित पौडेल: छोटा पॅकेट बडा धामाका, 16व्या वर्षीच मोडला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम)

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनम्ये रॉजर फेडरर याला भेटले. या भेटीत त्यांनी छान गप्पा मारल्या.

 

View this post on Instagram

 

What a day at the Australian open. An amazing way to finish the Australian summer. Forever grateful #ausopen

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपनम्ये रॉजर फेडरर याला भेटले. या भेटीत त्यांनी छान गप्पा मारल्या. विशेष म्हणजे रॉजरला त्यांची या आधीची भेटही आठवत होती. कोहलीने प्रतिक्रिया देताना म्हटले की, मला फार आनंद वाटला की, मी त्याला या आधी एकदाच भेटलो होतो. पण, त्याने मला लक्षात ठेवले आहे.