virender Sehwag,Gautam Gambhir And Shikhar Dhawan (Photo: Getty Image/PTI/ Instagram)

देशातील महत्वाकांक्षी मिशन चंद्रयान 2 (Chandrayaan 2) चा लँडर विक्रम चंद्रपासून केवळ 2.1 किलोमीटर दूर असताना त्यांचा संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांसाठी हा मोठा धक्का होता. परंतु, इस्त्रोचे (ISRO)मनोबल वाढवण्यासाठी देशाभरातून प्रयत्न केले जात आहेत. तसेच भारतीय संघाचे दिग्गज खेळाडूं शिखर धवन (Shikhar Dhawan), हरभजन सिंह (Harbhajan Singh), गौतम गंभीर (Gautam Gambhir), विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag), आकाश चोपडा (Akash Chopda) यांनीही इस्त्रोच्या या प्रयत्नांना सलाम केला आहे.

चंद्रावर पाय ठेवण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने संपूर्ण देशात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्त्रो शास्त्रज्ञांची भेट घेवून त्यांचे मनोबल वाढवले आहे. तसेच इस्रो च्या कंट्रोल रुममधून संपूर्ण देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित सर्व शास्रज्ञांचे कौतुक केले. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाचे माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून ते इस्त्रोचे आभार मानत असल्याचे समजते आहे. भारताचे सलामीवीर शिखर धवन यानेही इस्त्रोच्या धैर्याला सलाम केला आहे. तसेच भारताचे माजी फिरकी गोलंदाज यांनी प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही, या शब्दात इस्त्रोचे कौतुक केले आहे. हे देखील वाचा-चंद्रयान २: इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी कवी कुमार विश्वास यांनी लिहलेली कविता नक्की वाचा

भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंचे ट्विट-

वीरेंद्र सेहवाग-

शिखर धवन-

गौतम गंभीर-

आकाश चोपडा-

हरभजन सिंह-

दरम्यान, इस्रोचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत राहतो. जेव्हा हे अभियान मोठे असेल, तेव्हा निराशेवर मात करण्याची हिंमत करायला हवी" अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले आहे.