चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Chandrayaan 2) जाण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी (ISRO Scientists) अहोरात्र परिश्रम केले. पण चंद्रावर पाय टेकण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांसाठी हा मोठा धक्का होता. इस्त्रोच्या (ISRO) या प्रयत्नांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. डॉ. कवी कुमार विश्वास (Dr.Kumar Vishwas) यांनीही त्यांच्या कवितेतून (poem) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या सर्व भारतीयांचे चंद्रयान 2 कडे लक्ष वेधले गेले आहे.
चंद्रावर पाय ठेवण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटल्याने संपूर्ण देशात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी इस्त्रो शास्त्रज्ञांची भेट घेवून त्यांचे मनोबल वाढवले आहे. देशाभरातून करोडो लोकांनी इस्त्रोच्या या कार्याचे मनापासून कौतूक केले आहे. त्याचबरोबर कवी कुमार विश्वास यांनीही या विषयावर कविता लिहून त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विश्वास कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसाठी कविता केली आहे. "इस्त्रोच्या अहोरात्र परिश्रमावर संपूर्ण देश गर्व करत आहे. प्रयत्न सुरु ठेवा, असे लिहून यासह एक कविता पोस्ट केली आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये अब्दुल कलाम (Abdul Kalam) दिसतात", असे या कवितेतून ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Chandrayaan 2: राहुल गांधी यांच्याकडून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे तोंडभरुन कौतुक
कुमार विश्वास यांचे ट्वीट-
प्रिय @isro आप के अनथक श्रम व प्रतिभा पर पूरे देश को बहुत गर्व है ! प्रयास जारी रखें🙏
“लो हमने बढ़कर खोल दिया इस अंतरिक्ष का दुर्ग द्वार,
हे चंद्रदेव लो भारत की मेधा का पहला नमस्कार,
जिनके चेहरे में दिखते हैं रामेश्वर के अब्दुल कलाम,
इसरो के सभी साधकों को भारत के जन-जन का सलाम” pic.twitter.com/ng4FMRdQA8
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) September 6, 2019
दरम्यान इस्रोचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार येत राहतो. जेव्हा हे अभियान मोठे असेल, तेव्हा निराशेवर मात करण्याची हिंमत करायला हवी" अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवले आहे.