राहुल गांधी (Photo Credits: PTI)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Chandrayaan 2) जाण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी (ISRO Scientists) अहोरात्र परिश्रम केले. पण चंद्रावर पाय टेकण्यापूर्वीच विक्रम लँडरशी संपर्क तुटला. यामुळे सर्व शास्त्रज्ञांसाठी हा मोठा धक्का होता. इस्त्रोच्या या प्रयत्नांना देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदीनंतर (Narendra Modi) काँग्रेस नेते राहुल (Rahul Gandhi) गांधी यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्त्रोचे मनापासून कौतूक केले आहे. इस्त्रोचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत, संपूर्ण देश इस्त्रोच्या पाठिशी उभा आहे, असे ते म्हणाले.

सध्या चंद्रयान 2 कडे सपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे मनोबल वाढवण्याचे काम केले आहे. तसेच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधींनीही ट्विटरच्या माध्यमातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे भरभरुन कौतूक केले आहे. "देश इस्रोच्या पाठीशी उभा आहे. तसेच त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत. शास्त्रज्ञांनी या मोहिमेवर एक चांगले काम करत आणखी बऱ्याच महत्त्वाच्या आणि महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेचा पाया रचला आहे," असे राहुल गांधी म्हणाले. हे देखील वाचा-Chandrayaan 2: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ISRO च्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचं कौतुक; हार न मानता प्रयत्न सुरू ठेवण्याचा सल्ला

राहुल गांधीचे ट्विट-

काँग्रेस पक्षाने (Congress Party) त्यांचा आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, संपूर्ण देश सध्या इस्रोच्या टीमसोबत उभा आहे. अंतराळ संस्थेच्या मेहनत आणि बांधिलकीने देशाला अभिमान वाटत आहे.