Tokyo Olympics 2020: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलली
Tokyo Olympics 2020 (PC - Wikimedia Commons)

Tokyo Olympics 2020: कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. परिणामी टोकियो येथे होणारी ऑलिम्पिक स्पर्धा (Olympic Competition) इतिहासात पहिल्यांदाचं पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा 2021मध्ये घेण्यात येणार आहे. जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे (Japan PM Shinzo Abe) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बॅच यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दरम्यान, शिंझो अॅबे व थॉमस बॅच यांच्यामध्ये आज फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 2021 मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा घेण्यात येईल, असंही अॅबे यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - "माझे शहर असे दिसेल कधी वाटले नाही", COVID-19 मुळे कोलकाता लॉक डाउन पाहून सौरव गांगुली झाला भावुक)

या निर्णयाचा सर्वाधिक फटका जपानला बसणार आहे. जपानमध्येही ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यासह 1,700 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आज शिंझो अॅबे यांनी स्पर्धो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ऑलिम्पिक खेळ तीन वेळा रद्द करण्यात आले आहेत. पहिल्या विश्वयुद्धा दरम्यान ऑलिम्पिक प्रथम 1916 मध्ये रद्द करण्यात आले होते. त्यानंतर 1940 आणि 1944 दरम्यान दुसर्‍या महायुद्धामुळे ऑलिम्पिक खेळ खेळले गेले नव्हते.