Tiger Woods (Photo Credit: Facebook)

प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स (Tiger Woods) यांच्या कारला अपघात (Car Accident) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या (USA) लॉस एंजिल्स (Los Angeles) येथे मंगळवारी हा अपघात घडला आहे. या अपघातात टाइगर वुड्स यांच्या पायाला दुखापत झाली असून जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लॉस एंजेलिस काउंटी शेरीफच्या डिपार्टमेंटने दिलेल्या माहितीनुसार, कार अपघातानंतर वुड्सला गाडीतून बाहेर निघण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. त्याच्या कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातावेळी टायगर वुड्स हे गाडीमध्ये एकटे होते.

वुड्स वेगाने कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार दुभाजकाला जाऊन धडकली. महत्त्वाचे म्हणजे, टायगर वुड्सची गणना जगातील सर्वोत्कृष्ट गोल्फपटूंमध्ये केली जाते. त्यांनी आतापर्यंत 15 प्रमुख गोल्फ स्पर्धा जिंकल्या आहेत. हे देखील वाचा- Sachin Tendulkar on Nepotism: खेळाडूला मैदानातल्या कामगिरीमुळे ओळख मिळते, सचिन तेंडुलकर ने घराणेशाहीवरुन करण्यात आलेल्या ट्रोलर्सला दिले अप्रत्यक्षपणे उत्तर

एएनआयचे ट्वीट-

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टायगर वुड्सच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी बुधवारी ट्विट केले की, वुड्स  हे जगातील उत्कृष्ट खेळाडू असल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे.