सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

Sachin Tendulkar on Nepotism: भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याला नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या लिलावात मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याला 20 लाखांच्या बेस प्राइजमध्ये खरेदी केले. त्यानंतर सचिनवर अर्जुन तेंडुलकर याच्या नावाने लोकांनी घराणेशाहीवरुन टीका करण्यास सुरुवात केली. याच मुद्द्यावरुन सचिन याने ट्रोलर्सला अप्रत्यक्षपणे उत्तर दिले आहे.(Team India Pink-Ball Test: गुलाबी बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारा ‘हा’ आहे पहिला आणि सध्याचा एकमेव भारतीय फलंदाज, ईडनवर केली होती कमाल)

सचिनने असे म्हटले आहे की, एखाद्या खेळाडूला त्याच्या पार्श्वभुमीवरुन नव्हे तर त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे त्याला ओळख मिळते. त्याने अनअॅकेडमीचा ब्रान्ड अँम्बेसेडर बनल्यानंतर वर्च्युअली बातचीत करताना असे म्हटले की, खेळात मैदानात तुमच्या कामगिरी व्यतिरिक्त कोणतीही अन्य गोष्टीला महत्व नसते.

पुढे सचिनने असे ही म्हटले की, आम्ही सर्वजण जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश करतो त्यावेळी तुम्ही कुठून आहात ते ग्राह्य धरले जात नाही. तसेच तुम्ही कोणत्या देशातून आलात किंवा तुमचे कोणाशी काय संबंध आहे हे सर्वांसाठी समान असते. तसेच विविध शाळा आणि बोर्डाचा हिस्सा असल्याने विविध प्रेक्षकांना भेटतो. मी स्वत: काही गोष्टी शिकतो आणि तो हाच अनुभव मी सांगू इच्छितो.

दरम्यान, इंडियन प्रीमियम लीगच्या 14 व्या सीजन पूर्वी खेळाडूंसाठी लिलाव झाला. या वर्षात ऑक्शनमध्ये काही अशा खेळाडूंवर लिलाव केला गेला ज्यांना खरेदी करण्याची सुद्धा अपेक्षा नव्हती. या खेळाडूंपैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचे सुद्धा नाव आहे. अर्जुन याला मुंबई इंडियन्स संघाने 20 लाखांना खरेदी केले.(IPL 2021 लिलावात अनसोल्ड राहिलेल्या न्यूझीलंड फलंदाज Devon Conway याची स्फोटक खेळी, AUS विरुद्ध 59 चेंडूत केल्या तुफान 99 धावा)

संघात स्थान मिळाल्यानंतर ट्विटरवर अर्जुन तेंडुलकर याच्या लिलावीवर प्रश्न उपस्थितीत करत युजर्सने नाखुशी दर्शवली. तसेच युजर्सकडून निंदा सुद्धा केली गेली. पण हा मुद्दा तेव्हा उचलून धरला गेला तेव्हा लोकांनी नोपोटिज्म शब्दांचा वापर करण्यास सुरुवात केली.