VV Karmarkar (PC - Twitter)

VV Karmarkar Passed Away: मराठी दैनिकात क्रीडा पान सुरू करून विविध खेळांना मानाचे पान देणारे ज्येष्ठ क्रीडा संपादक, क्रीडा पानाचे जनक ज्येष्ठ पत्रकार वी. वी. करमरकर (VV Karmarkar) यांचे निधन झालं आहे. करमरकर यांनी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वी. वी. करमरकर हे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचकही होते. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडापत्रकारितेचे जनक हरपला असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली आहे.

वी. वी. करमरकर यांच्या निधनानंतर अनेक राजकारण्यांनी शोक व्यक्त केला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी करमरकर यांना आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'मराठी दैनिकात देशी, विदेशी खेळांसाठी क्रीडा विशेष पान देणारे आणि 'क्रीडा पानाचे जनक' म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांच्या निधनाने मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक हरपले. वि. वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!' (हेही वाचा -

याशिवाय भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीदेखील आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वी वी करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'मराठी दैनिकात क्रीडा पान सुरू करून विविध खेळांना मानाचे पान देणारे ज्येष्ठ क्रीडा संपादक, क्रीडा पानाचे जनक वि. वि. करमरकर यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक हरपले आहेत. तत्त्वनिष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!'

याशिवाय करमरकर यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शोक व्यक्त केला असून मराठी पत्रकारितेत क्रीडा पत्रकाराला आणि क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या वि. वि. करमरकर यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राचा मार्गदर्शक हरपला आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.