सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

मास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार 24 एप्रिलला सचिन 47 वर्षांचा होईल. सचिनच्या निकटवर्ती सूत्रांनी सांगितले की, जगभरातील कोविड-19 (COVID-19) आणि देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सचिनने असा निर्णय घेतला आहे. सचिनचा वाढदिवस सहसा अत्यंत भव्य पद्धतीने साजरा केला जातो. यात अनेक नामांकित सेलिब्रिटींचा समावेश आहे. पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे आणि म्हणूनच सचिनने साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. सचिनला क्रिकेटचा देव म्हणतात. निवृत्तीच्या बऱ्याच वर्षानंतरही चाहत्यांमधील त्याची क्रेज कमी झालेली नाही. त्याला केवळ भारतच नव्हे तर जगातील सर्वोत्तम फलंदाज मानले जाते. जगातील कानाकोपऱ्यातील त्याचे चाहते त्याचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. (सचिन तेंडुलकर ने 'Desert Storm' मधे खेळला तुफानी डाव; ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले होते 143 धावा, पाहा Highlights)

“सचिनने निर्णय घेतला आहे की ही उत्सवाची वेळ नाही. अग्रभागी असलेल्या सर्व डॉक्टर, परिचारिका, पॅरा-मेडिक्स, पोलिस, संरक्षण कर्मचारी यांना ही सर्वात चांगली श्रद्धांजली आहे, असे त्याला वाटते,” असे या खेळाडूच्या जवळच्या सूत्रांनी बुधवारी पीटीआयला सांगितले. तेंडुलकरने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी यापूर्वी एकूण 50 लाख रुपयांचे योगदान दिले आहे. इतर अनेक मदत कार्यात त्याचा सहभाग आहे. “तो नेहमी या पैलू बद्दल बोलण्यात खूप अस्वस्थ होतो,” सूत्रांनी सांगितले. सोशल डिस्टंसिंगची प्रत्येक प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा जग गंभीर संकटातून जात आहेअशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात अर्थ नाही, असे सचिनचे मत आहे.

रोजंदारीवर अवलंबून असणाऱ्या मजुरांना लॉकडाउनमुळे कठीण वेळेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सचिनने 5000 लोकांच्या राशनची व्यस्था केली आहे. या स्वयंसेवी संस्थेने ट्विटद्वारे भारताच्या महान फलंदाजाचे आभार मानले आहेत. त्याच्या वाढदिवशी असंख्य फॅन क्लब सोशल मीडियावर नाविन्यपूर्ण पद्धतीने त्याला ट्रिब्यूट देतात. पीटीआयमध्ये दिलेल्या माहितीनुसार एक फॅन-क्लब मास्टर-ब्लास्टरची 40 दुर्मिळ छायाचित्रे प्रकाशित करणार आहे आणि दुसरा एक या वर्षांत सचीनने हाती घेतलेल्या सर्व सामाजिक कार्य आणि उपक्रमांवर प्रकाश टाकणार आहे.