22 एप्रिल 1988 रोजी सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शारजाहच्या (Sharjah) मैदानावर डाव खेळला जो आजही क्रिकेटच्या ध्यानीमनी आहे. कोका-कोला कपच्या तिरंगी मालिकेच्या सेमीफायनल सामन्यात सचिनने शारजाहच्या मैदानावर कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट डाव खेळला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सामन्यात भारताला 26 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले पण सचिनची तुफानी खेळी आणि नेट रन रेटनुसार भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली. सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 7 गडी गमावून 284 धावा केल्या. जेव्हा भारतीय डाव सुरू झाला तेव्हा शारजाहमध्ये धुळीचे वादळ (Desert Storm) आले आणि त्यामुळे सामना थोडा वेळ थांबवावा लागला. वादळ थांबल्यावर सामनापुन्हा सुरू झाला. यानंतर सचिनने शारजाहच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने जोरदार धावा केल्या ज्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढवली. सचिनने 131 चेंडूत 143 धावांचा तूफानी डाव खेळला ज्यात 9 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. (On This Day: 'डेजर्ट स्टॉर्म' जेव्हा सचिन तेंडुलकर ने शारजाहमध्ये शेन वॉर्न ची केली धुलाई, 22 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात निर्माण केली दहशत)
सचिनने स्वबळावर भारताला विजय मिळवून दिला. सचिनचा हा अविस्मरणीय डाव 'डेझर्ट स्टॉर्म' (Desert Storm)म्हणून ओळखला जातो. सचिनने त्या सामन्यात 14 वे वनडे शतक ठोकले आणि भारतीय संघ 46 ओव्हरमध्ये 250 धावा करू शकला. वादळानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार स्कोअर सुधारण्यात आला, ज्यामुळे भारताला 46 ओव्हरमध्ये 276 धावांचे लक्ष्य मिळाले आणि अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी 46 षटकांत 238 धावांचे लक्ष्य मिळाले जे भारतीय संघाने गाठले. त्याच्या खेळीत सचिनने शेन वॉर्नच्या डोक्यावरून षटकार ठोकला होता तो अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. पाहा त्या डावाचे हायलाईट्स:
कांगारू संघाला स्वप्नातही हा स्फोटक डाव विसरणे कठीण आहे. हा डाव पाहिल्यानंतर सचिन वॉर्नच्या स्वप्नात येऊ लागला. वॉर्नने स्वत: एका मुलाखतीत याच्या बद्दल खुलासा केला. सेमीफायनलमध्ये विजयानंतर अंतिम सामन्यात देखील भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने आले ज्यात पुन्हा एकदा सचिनच्या जबरदस्त खेळी केली आणि भारताला जेतेपद मिळवून दिले.