
बर्मिंगहॅममध्ये (Birmingham) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात भारताने इंग्लंडचा (IND vs ENG) 49 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांची टी20 मालिका 2-0 अशी जिंकली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लिश संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक खास विक्रम आपल्या नावावर केला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध 20 चेंडूत 31 धावा केल्या.
यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले. पहिले चौकार मारताच रोहितने विराट कोहलीला मागे टाकले. रोहित आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. याशिवाय अशी कामगिरी करणारा तो जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक चौकार मारले आहेत. हेही वाचा Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील अर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या यांचे आंदोलनाला समर्थन
तिसऱ्या क्रमांकावर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 300 हून अधिक चौकार मारणारा विराट कोहली हा दुसरा फलंदाज आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे, ज्याने 325 चौकार मारले आहेत. त्याचबरोबर भारतीय कर्णधार रोहित शर्माने 301, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 298, मार्टिन गुप्टिलने 287 आणि अॅरॉन फिंचने 286 चौकार मारले आहेत.