Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील अर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या यांचे आंदोलनाला समर्थन

कोलंबो, गालेसह जवळपास सर्वच शहरांमध्ये वाईट परिस्थितीचा परिणाम दिसून येत आहे. श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटूही देशातील जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात.

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील अर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर, कुमार संगकारा, सनथ जयसूर्या यांचे आंदोलनाला समर्थन
Photo Credit - Twitter

भारताचा शेजारी देश श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत गंभीर (Sri Lanka Crisis) बनली आहे. आर्थिक विवंचनेमुळे हताश झालेले आंदोलक शनिवारी राष्ट्रपती भवनात पोहोचले, त्यानंतर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पळ काढला. कोलंबो, गालेसह जवळपास सर्वच शहरांमध्ये वाईट परिस्थितीचा परिणाम दिसून येत आहे. श्रीलंकेचे दिग्गज क्रिकेटपटूही देशातील जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले दिसतात. माजी कर्णधार कुमार संगकाराने लोकांच्या कामगिरीचा व्हिडिओ शेअर करताना लिहिले, 'हे आमच्या भविष्यासाठी आहे.' संगकाराचा सहकारी महेला जयवर्धनेनेही त्याचे ट्विट रिट्विट केले. दुसर्‍या ट्विटमध्ये जयवर्धनेने गोटाबाया राजपक्षे यांना #GoHomeGota वापरून पद सोडण्याचा सल्ला दिला आहे.

श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या आंदोलकांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरला आहे. सनथ जयसूर्याही कोलंबोतील राष्ट्रपती भवनाजवळ पोहोचले, तिथे आंदोलकांची गर्दी आहे. जयसूर्याने याबाबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2022 06:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).