IND vs WI: रोहित शर्माचा लज्जास्पद विक्रम, टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शुन्यावर बाद होणारा खेळाडू बनला
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

रात्री उशिरा सेंट किट्स (St. Kitts) येथे वेस्ट इंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाला (Team India) 5 विकेट्सनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जास्त अपयशी ठरला आणि तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यासोबतच रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा हा भारतासाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बाद होणारा खेळाडू आहे. रोहित शर्मा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतण्याची ही 8वी वेळ होती. या यादीत रोहित शर्मानंतर केएल राहुलचा नंबर येतो.

केएल राहुल टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खाते न उघडता चार वेळा पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. मात्र, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची नावे आणखी एका खास यादीत येतात. रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी 4 शतके झळकावली आहेत. या प्रकरणात केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.  राहुलने आतापर्यंत टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन शतके झळकावली आहेत. हेही वाचा IND vs WI 5th T20: आज भारत आणि वेस्ट इंडिजमधील 5वा T20 सामना, जाणून घ्या हवामानाची स्थिती

सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. भारताचा संपूर्ण संघ 19.4 षटकात 138 धावा करून ऑलआऊट झाला. या सामन्यात भारताकडून एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. वेस्ट इंडिजने हे लक्ष्य 19.2 षटकांत 5 विकेट्स गमावून अगदी सहज गाठले. मात्र, तरीही भारताला मालिकेत पुनरागमन करण्याची मोठी संधी आहे.  दोन्ही देशांमधला तिसरा टी20 सामना 2 ऑगस्टला होणार आहे. मात्र, भारतीय वेळेनुसार आता तिसरा टी20 सामना रात्री 8 ऐवजी रात्री 9.30 वाजता सुरू होईल.