दिल्ली: मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी फॉर्मात असलेला सलामीवीर ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड केल्याबद्दल त्याचे कौतुक केले आहे. चेतन शर्मा म्हणाले की, महाराष्ट्राचा हा फलंदाज टीम इंडियासाठी खूप यशस्वी ठरू शकतो. भारतीय संघ पार्ल आणि केपटाऊन येथे 19, 21 आणि 23 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची निवड केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) अनुपस्थितीत केएल राहुलकडे (KL Rahul) संघाची कमान सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी जसप्रीत बुमराह (jasprit Bumrah) संघाचा उपकर्णधार असेल. संघ निवडीनंतर चेतन शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चेतन शर्मा म्हणतात, ऋतुराज गायकवाडला योग्य वेळी संधी मिळाली आहे. तो टी-20 संघात होता आणि आता तो एकदिवसीय संघातही आहे. निवडकर्त्यांना वाटते की त्याला ज्या फाॅर्मेट मध्ये स्थान मिळेल ते देशासाठी खूप यशस्वी असेल. ऋतुराज जो मूळचा पुण्याचा आहे, 2021 च्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये 635 सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता आणि चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद मिळवून देण्यास त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. चेतन शर्माच्या मते, ऋतुराजला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले. “आम्ही ऋतुराजची निवड केली आहे. आता तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी खेळू शकतो, त्याची कधी गरज आहे आणि संयोजन काय असेल हे पाहणे संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. (हे ही वाचा U19 Asia Cup Final: टीम इंडिया बनली चॅम्पियन, फायनलमध्ये श्रीलंकेला केल पराभुत.)
आयपीएलमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर ऋतुराजने, सलामीवीराने विजय हजारे ट्रॉफीमध्येही आपला चांगला फॉर्म कायम ठेवला, त्याने पाच सामन्यांमध्ये 168 च्या सर्वोत्तम स्कोअरसह 603 धावा केल्या. गेल्या वर्षी जुलैमध्ये कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेतून त्याने पदार्पण केले होते.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज