यूएई (UAE) मध्ये खेळल्या जात असलेल्या अंडर-19 आशिया कपमध्ये (U19 Asia Cup) भारताने (India Win) विजयाचा तिरंगा फडकावला आहे. यश धु्ल्लच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंडर-19 आशिया कप जिंकला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा (Sri Lanka) 9 गडी राखून पराभव केला. पाऊस झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 38 षटकांत केवळ 106 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने केवळ एक गडी गमावून लक्ष्य गाठले. डकवर्थ-लुईस नियमानुसार, भारतीय संघाला 38 षटकांत 102 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी अंगक्रिश रघुवंशी आणि शेख रशीद यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पूर्ण केले.
Tweet
WHAT. A. WIN! ☺️ 👏
India U19 beat Sri Lanka U19 by 9⃣ wickets to clinch the #ACC #U19AsiaCup title. 🏆 👍 #BoysInBlue #INDvSL
Scorecard ▶️ https://t.co/GPPoJpzNpQ
📸 📸: ACC pic.twitter.com/bWBByGxc3u
— BCCI (@BCCI) December 31, 2021
भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो गोलंदाज. विशेषत: डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवाल आणि ऑफस्पिनर कौशल तांबे यांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना श्वास सोडू दिला नाही. विकी ओस्तवालने 8 षटकात केवळ 11 धावा देत 3 बळी घेतले. त्याने 3 ओव्हर मेडन्स टाकल्या. कौशल तांबेनेही 6 षटकांत 23 धावा देत 2 बळी घेतले. राज्यवर्धन, रवी कुमार आणि राज बावा यांनी 1-1 बळी घेतला.
भारत 8व्यांदा चॅम्पियन
अंडर-19 आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व कायम आहे. टीम इंडियाने 8व्यांदा आशिया कप जिंकला. भारताने पहिल्यांदा ही स्पर्धा 1989 मध्ये जिंकली होती. यानंतर 2003 मध्ये तो पुन्हा चॅम्पियन बनला. 2012 मध्ये त्याने ट्रॉफी पाकिस्तानसोबत शेअर केली होती. यानंतर 2013, 2016 मध्येही भारताने ही स्पर्धा जिंकली होती. 2017 मध्ये अफगाणिस्तान आशियाचा बॉस बनला. आता टीम इंडियाने 2018, 2019 आणि आता 2021 मध्ये आशिया कप चॅम्पियन बनून विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.