प्रो कबड्डी लीगच्या (Pro Kabaddi League2019) सातव्या सीझनमध्ये ,आज जयपूर पिंक पँथर्स (Jaipur Pink Panthers) विरुद्ध हरयाणा स्टिलर्स (Haryana Steelers) हा एकतर्फी सामना मुंबईमध्ये पार पडला. यामध्ये सुरुवातीपासुनच पँथर्सनी आपले वर्चस्व बनवून ठेवले होते तर सामन्याअंती 37- 21 अशा पॉइंट्सच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर सलग तीन खेळांमध्ये लागोपाठ विजय मिळवण्याचा मान सुद्धा पँथर्सना मिळाला आहे.दरम्यान आज सामना पाहण्यासाठी जयपूर संघाचा मालक अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) यांच्यासोबतच स्वतः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सुद्धा खास उपस्थिती दर्शवली होती. बिग बी संपूर्ण सामना सुरु असताना सतत ते प्रोत्साहन देताना पाहायला मिळत होते, तसेच संघाला मिळणाऱ्या प्रत्येक पॉईंट नंतर अक्षरशः उद्या मारून आनंद देखील व्यक्त करत होते. यामुळे अनेकांनी बिग बी हेच आजच्या खेळात पँथर्स साठी लकीचार्म ठरल्याचे सुद्धा म्हंटले आहे.
3⃣ wins in 3⃣ games - the Panthers are on 🔥!
Did you enjoy @JaipurPanthers' 37-21 win over @HaryanaSteelers in #HARvJAI tonight?
Keep watching #VIVOProKabaddi Season 7 action, LIVE on Star Sports & Hotstar. #IsseToughKuchNahi
— ProKabaddi (@ProKabaddi) July 31, 2019
Full Time: 37-21
The #PantherSquad display a solid all-round effort and get the win over the Haryana Steelers.#RoarForPanthers #HARvJAI#IsseToughKuchNahi #VIVOProKabaddi pic.twitter.com/k3t9H74kxl
— Jaipur Pink Panthers (@JaipurPanthers) July 31, 2019
आजच्या सामन्यात पहिल्या 20 मिनिटांच्या खेळीत पँथर्सने मोठ्या फरकाने लीड घेतली होती, ही लीड दुसऱ्या टाइमआऊट मध्ये देखील कायम ठेवत त्यांनी हरियाणा स्टीलर्सवर आपला दबाव कायम ठेवला होता. आजच्या सामन्यात दीपक निवास हुड्डा, संदीप धूल, अजिंक्य पवार यांनी अफलातून कामगिरी केली होती. दिपकने आजच्या सामन्यात हरियाणाला दोनदा ऑल आऊट करत गुणांमध्ये भर टाकली होती तर संदीपने सामन्यात दोनदा HIGH 5 घेत 10 पॉईंट्स कमावून दिले होते. तसेच अजिंक्यने ऐन मोक्याच्या वेळी डू और डाय मध्ये 2 पॉईंट्स मिळवले.