Sania Mirza च्या बाळाची पहिली झलक; सोशल मीडियावर शेअर केला फोटो
Izhaan Mirza Malik, with mom Sania Mirza (Photo Credits: Instagram)

भारताची टेनिसपटू सानिया मिर्जा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) यांच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच चिमुकल्याचे आगमन झाले. 30 ऑक्टोबरला सानिया मिर्जाने चिमुकल्याला जन्म दिला. या बाळाचे नाव 'इजान मिर्जा मलिक' असं ठेवण्यात आलं. आज सानिया आणि शोएबने इजानचा पहिला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. शोएब- सानिया मिर्जाच्या बाळाला पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी नकार

तुम्हीही पाहा सानियाच्या बाळाची पहिली झलक....

सानिया-शोएबचा विवाह 2010 साली हैद्राबाद येथे मुस्लिम पद्धतीने झाला होता. शोएब पाकिस्तानी असल्याने या विवाहावर प्रचंड टीका झाली होती. मात्र दोघांनीही खंबीर राहत आपले नाते जपले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या आयुष्यात इजानच्या रुपात आनंद आला. बाळाच्या आगमानापूर्वी सानियाने बाळासाठी हळवा मेसेज शेअर केला.  बाळाच्या जन्मानंतरही बाळ भारतीय की पाकिस्तानी यावरुन सोशल मीडियात प्रचंड चर्चा रंगल्या.