Video : सानिया मिर्झाने शेअर केला तिच्या बाळासाठी हळवा मेसेज !
सानिया मिर्झा (Photo Credits: YouTube Video Grab)

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी शोएब मलिकच्या आयुष्यात लवकरच बाळाचं आगमन होणार आहे. सानियाच्या गरोदरपणाचा सध्या तिसरा आणि अंतिम टप्पा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका मासिकासाठी सानिया मिर्झाने फोटोशूट केल्यानंतर आता एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये सानिया कुशीत एक गोंडस बाळ विसावणार आहे. त्या बाळाला उद्देशून सानियाने एक खास संदेश शेअर केला आहे.

सानियाचा दमदार संदेश

सानिया मिर्झा टेनिसपटू आहे. येत्या काही दिवसात होऊ घातलेलं बाळ मुलगा असेल किंवा मुलगी, परंतू लोक काय म्हणतील याला घाबरून न जाता तुझ्या ध्येयांचा, स्वप्नांचा तू पाठलाग कर ! अशा आशयाचा खास संदेश सानियाने बाळाचा जन्म होण्यापूर्वीच त्याला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी सानियाला तिचं बाळ भारतीय की पाकिस्तानी नागरिकात्वाचं असेल ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र त्यावेळेसही पत्रकारांना आणि ट्रोलर्सना सानियाने सडेतोड उत्तर दिले होते. खेळ हा मी माझ्यासाठी, माझ्या देशासाठी खेळते. माझं प्रोफेशन आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य वेगवेगळं असल्याचं ठणकावून सांगितलं आहे.