भारतीय टेनिसपटू सानिया मिर्जा हिने बुधवारी तिच्या विवाही आयुष्यात एका बाळाला जन्म दिला आहे. तर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब आणि सानियाने त्यांच्या बाळाचे नामकरण केले असून इजान असे नाव ठेवले आहे.
पाकिस्तान संघाचा माजी कॅप्टन शोएब मलिक बाप झाला आहे. मात्र त्यांच्या या नवजात मुलाच्या प्रकरणाने तो चिंतेत दिसत आहे. कारण इजानला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळण्यासाठी नकार देण्यात आला आहे. पाकिस्तनच्या एफआयईए या कंपनीच्या सूत्रांनुसार भारतीय नागरिकत्व असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानचा पासपोर्ट आणि इमिग्रेशनच्या नियमांनुसार या देशाचे नागरिकत्व मिळू शकत नाही अशी अट आहे. तसेच इजानचा जन्म हा भारतात झाल्याने तो भारतीय असल्याचे म्हटले जात आहे. तर सानियाने शोएबसोबत लग्न केल्यानंतर भारतीयत्व सोडले नाही आहे.
सानिया मिर्जा - शोएब मलिकने ठेवलं मुलाच नाव इजान मिर्जा मलिक !
मात्र या नवजात इजानमुळे शोएबच्या घरी आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तसेच या दोघांच्या चाहत्यांनी इजानला येणाऱ्या भावी आयुष्यासाठी आशिर्वाद दिले आहेत.