सानिया मिर्जा - शोएब मलिकने ठेवलं मुलाच नाव इजान मिर्जा मलिक !
शोएब मलिक आणि सानिया (Photo Credits: Instagram)

सानिया मिर्जा आणि शोएब मलिक या जोडीने आज ( 30 ऑक्टोबर) सकाळी त्यांच्या आयुष्यात एका चिमुकल्याचा सहभाग झाल्याची गोड बातमी दिली. शोएब मलिकने ट्विटरच्या माध्यमातून सानिया मिर्जाने मुलाला जन्म दिला असून तिची प्रकृती उत्तम असल्याची बातमी सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे. आता सानिया आणि शोएबच्या मुलाचं नावही जाहीर करण्यात आलं आहे. शोएब आणि सानियाने चिमुकल्याचं नाव 'इजान मिर्जा मलिक' असं ठेवलं आहे.

इजान या नावाचा अर्थ दैवी भेटवस्तू (दैवी देणगी) असा होतो. सानिया आणि शोएबचं पहिलं बाळ हे त्यांच्या दृष्टीने नावाला साजेसा अनुभव आहे. ट्विटरच्या माधय्मातून शोएब मलिकने गूडन्यूज शेअर करताना चाहत्यांचे आभारही मानले होते.

सानिया मिर्जा ही भारतीय टेनिसपटू आहे तर शोएब मलिक हा पाकिस्तानेऐ क्रिकेटपटू आहे. सानिया आणि शोएबचं लग्न 2010 साली हैदराबाद येथे पारंपारिक मुस्लिम पद्धतीने पार पडलं होतं. गरोदरपणाच्या काळातही सानिया अ‍ॅक्टिव्ह होती. बाळाच्या जन्मापूर्वी काही दिवस तिने त्याच्यासाठी एक हळवा मेसेज व्हिडिओच्या माध्यामातून शेअर केला होता.