सानिया मिर्झा (Photo Credit: Getty)

टेनिस स्टार सानिया मिर्झा (Sania Mirza) सोमवारी फेड कप हार्ट अवॉर्ड (Fed Cup Heart Award) जिंकणारी पहिली भारतीय ठरली. सानिया हा पुरस्कार टूर्नामेंट जिंकण्यासाठी नाही तर आई झाल्यानंतर कोर्टवर यशस्वी पुनरागमन करण्यासाठी दिले गेले. या बक्षीसाची रक्कम तिने तेलंगणा (Telangana) सीएम रिलीफ फंडामध्ये हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिने सोशल मीडियावरून जाहीर केले. सानियाला या पुरस्कारासह 2 हजार डॉलर्सची बक्षीस रक्कमही मिळाली. सानियाला आशिया-ओशिनिया क्षेत्रासाठी फेड कप हार्ट पुरस्कार देण्यात आला आहे. एकूण 16985 पैकी तिला दहा हजाराहून अधिक मतं मिळाली आणि विजयी ठरली. फॅड कप हार्ट पुरस्काराचा विजेता चाहत्यांच्या मतांच्या आधारावर निवडला जातो. यासाठी 1 मेपासून मतदान सुरू झाले. सानियाला एकूण मतापैकी 60 टक्के मते मिळाली. (Coronavirus: गौतम गंभीर याने कोरोनामुळे निधन झालेल्या दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल अमित कुमारच्या कुटुंबासाठी पुढे केला मदतीचा हात)

हा पुरस्कार जिंकल्यानंतर ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने (एआयटीए) जारी केलेल्या निवेदनात या स्टार भारतीय खेळाडूने म्हटले आहे की, ‘‘फेड कप हार्ट अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय म्हणून अभिमानाची बाब आहे. मी हा पुरस्कार संपूर्ण देश आणि माझ्या चाहत्यांना समर्पित करते. भविष्यात देशासाठी अधिक यश मिळवण्याचा मी प्रयत्न करेन.’’ सानिया चार वर्षानंतर फेड कपद्वारे पुनरागमन केलेलं आणि इतिहासात प्रथमच भारताने प्लेऑफमध्ये प्रवेश केला.

ऑक्टोबर 2018 मध्ये मुलगा इझानला जन्म दिल्यानंतर सानिया यावर्षी जानेवारीत कोर्टवर परतली. तिने नादिया किचेनोकच्या साथीने हॉबर्ट ओपन स्पर्धा जिंकली. दरम्यान, सानियाने यापूर्वीही कोरोना व्हायरसविरूद्ध युद्धात योगदान दिले आहे. तिने हजारो गरजू कुटुंबांना 1.25 कोटी रुपयांचे धान्य उपलब्ध करुन दिले. तिने एक लाख लोकांना मदत करण्याचे शपथ घेतली होती. या मोहिमेसह सानियाने लोकांनादेखील गरजूंच्या मदतीसाठी पुढे येण्यास आणि त्यांच्या क्षमते अनुसार मदत करण्यासाठी प्रेरित केले होते.