Under-17 World Wrestling Championship: भारताच्या साईनाथ पारधी (Sainath Pardhi) ने बुधवारी अम्मान, जॉर्डन येथे झालेल्या 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत (Under-17 World Wrestling Championship) पुरुषांच्या 51 किलो ग्रीको-रोमन गटात कांस्यपदक (Bronze Medal) जिंकले. पारधीने कझाकस्तानच्या येरासिल मुसानचा 3-1 असा पराभव करत ही कामगिरी केली. तत्पूर्वी, त्याने रेपेचेज फेरीत अमेरिकेच्या मुनारेटो डॉमिनिक मायकेलचा 7-1 असा पराभव करून कांस्यपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले होते.
या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनीही चांगली कामगिरी केली. चार भारतीय महिला कुस्तीपटूंनी अंतिम फेरीत प्रवेश केला असून आता सुवर्णपदकासाठी त्यांच्यात स्पर्धा होणार आहे. 43 किलो गटात अदिती कुमारीने रशियाच्या अलेक्झांड्रा बेरेझोव्स्कायाला 8-2 ने पराभूत करून सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश केला, जिथे तिचा सामना ग्रीसच्या मारिया एल गिकाशी होईल. अदितीने युक्रेनच्या कॅरोलिना श्पेरिकचा 10-0 आणि मरियम मोहम्मद अब्देलालचा 4-2 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. (हेही वाचा - Neeraj Chopra: ऑलिम्पिकनंतर नीरज चोप्रा मैदानात उतरणार, पाहा कुठे आणि कधी)
दरम्यान, 57 किलो गटाच्या उपांत्य फेरीत नेहाने कझाकस्तानच्या ॲना स्ट्रॅटनचा 8-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली, जिथे तिचा सामना जपानच्या सो त्सुत्सुईशी होईल. नेहाने आतापर्यंतच्या सर्व सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामध्ये तिने ग्रीसच्या मेरी मणीचा पराभव केला आणि जॉर्जियाच्या मिरांडा कपनाडझेविरुद्ध तांत्रिक श्रेष्ठतेने विजय मिळवला. (हेही वाचा - Womens T20 World Cup 2024: महिला टी-20 विश्वचषक बांगलादेशात नाही खेळवला जाणार, ICC ने नवीन ठिकाणाची केली घोषणा)
65 किलो वजनी गटात पुलकित पोहोचली अंतिम फेरीत -
तथापी, 65 किलो वजनी गटात पुलकितने इजिप्तच्या मरम इब्राहिम अलीचा 3-0 असा पराभव केला आणि आता अंतिम फेरीत तिचा सामना रशियाच्या डारिया फ्रोलोवाशी होणार आहे. पुलकितने याआधी चीनच्या लिंग काईला 'विजय बाय फॉल' आणि त्यानंतर ब्राझीलच्या ज्युलियाना कॅटानझारोचा 9-0 ने पराभव केला होता.
मानसी लाथेरने गाठली अंतिम फेरी -
याशिवाय, 73 किलो वजनी गटात मानसी लाथेरने युक्रेनच्या क्रिस्टिना डेमचुकचा 12-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली, जिथे तिचा सामना सुवर्णपदकासाठी हॅना पिरस्कायाशी होईल.
रौनक दहियाने जिंकले कांस्यपदक -
मंगळवारी रात्री झालेल्या ग्रीको-रोमन कांस्य पदकाच्या प्ले-ऑफमध्ये, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोनकने तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकानचा 6-1 असा पराभव करून भारतासाठी पहिले पदक जिंकले. भारताच्या युवा कुस्तीपटूंची ही कामगिरी देशासाठी अभिमानाची बाब आहे.