Neeraj Chopra (Photo Credit - X)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा अर्शद नदीम यावेळी गोल्ड मेडल जिंकला आणि नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पण आता उतरणार आहे. नीरजची ही स्पर्धा कधी होणार आहे आणि किती वाजता सुरु होणार आहे, हे आता समोर आले आहे.  नीरज यंदाच्या मोसमात यापूर्वी केवळ दोहा स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यानंतरही त्याला स्पर्धेत चौथे मानांकन आहे.  (हेही वाचा - Womens T20 World Cup 2024: महिला टी-20 विश्वचषक बांगलादेशात नाही खेळवला जाणार, ICC ने नवीन ठिकाणाची केली घोषणा)

भारताचा नीरज चोप्रा गुरुवारी होणाऱ्या ल्युसान डायमंड लीगमध्ये सहभागी होणार आहे. ल्युसानमध्ये नीरजसमोर ऑलिम्पिक ब्राँझपदक विजेता अँडरसन पीटर्स आणि टोकियोतील रौप्यपदक विजेता जाकुय वॅदलेच यांचे आव्हान असेल. पाकिस्तानचा अर्शद नदीम मात्र या स्पर्धेत खेळणार नाही. डायमंड लीगमधील नीरजची स्पर्धा भारतीय वेळेनुसार गुरुवारी मध्यरात्री 12.23 वाजता होणार आहे.

नीरज चोप्रा आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार की नाही, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे. कारण नीरजने गेल्या दोन्ही ऑलिम्पिक्समध्ये पदकं जिंकली आहेत. त्यामुळे आथा पुढच्या ऑलिम्पिकमध्ये तो कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.