लज्जास्पद! सुनील छेत्री बनला रेसिस्ट टिप्पणीचा शिकार, विराट कोहलीबरोबर लाईव्ह चॅट दरम्यान यूजरने केली वर्णद्वेषी कमेंट
विराट कोहली आणि सुनील छेत्री (Photo Credit: Twitter)

ईशान्य (North-East) भारतातील लोकांच्या रंग-रूपावर अनेकदा भाष्य करताना आपण पहिले असतील. खेळातील वर्णद्वेष ही सर्वात कठीण समस्या आहे. वेळोवेळी स्टेडियममधील चाहत्यांनी खेळाडूंवर त्यांच्या जाती, रंग किंवा धर्माच्या आधारे निशाणा साधला आहे. कोरोना व्हायरस महामारीच्या काळात जेव्हा क्रीडा क्षेत्र पूर्णपणे ठप्प झाले आहे तेव्हा काहीजण सोशल मीडियाचा वापर वंशविद्वेष पसरवण्यासाठी करत आहेत. रविवारी असच एक दृश्य समोर आले जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसमवेत (Sunil Chhetri) इन्स्टाग्राम लाइव्हवर गेला होता. छेत्रीवर इन्स्टाग्राम लाइव्ह चॅट दरम्यान अशीच 'वर्णद्वेषी' टिप्पणी करण्यात आली. 90 मिनिटांच्या लाइव्ह चॅट दरम्यान विराट कोहलीने आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक जुन्या आठवणी शेअर केल्या. दरम्यान, यश शर्मा नावाच्या यूजरने या लाईव्ह व्हिडिओवरील टिप्पणीमध्ये लिहिले की, 'हा नेपाळी कोण आहे?' त्याचा संदर्भ छेत्री होता, जो ईशान्य भारतातील मणिपूर राज्यातील आहे. (अनुष्का शर्मा ने उघड केला विराट कोहली याचा खोटारडेपणा, सुनील छेत्री याला लाईव्ह चॅटमध्ये झाले हसू अनावर, पाहा Video)

ईशान्य लोकांच्या या प्रकारच्या समस्या नंतर ट्विटरवर शेअर करण्यात आल्या. अभिनव नावाच्या यूजरने लिहिले की, 'भारतीय फुटबॉल कर्णधाराला नेपाळी म्हटले जात आहे, ज्याद्वारे ईशान्य लोकांच्या परिस्थितीची कल्पना केली जाऊ शकते. छेत्रीला ओळखत नसलेले लोकं ठीक आहेत पणत्यांच्याबद्दल चिंकी, नेपाळीसारखे शब्दांचा वापर करणे लज्जास्पद आहे.

यूजरच्या छेत्रीविरुद्ध अशा टिप्पणीने सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला. अगदी दयनीय, एका यूजरने लिहिले. पाहा अन्य यूजर्सच्या प्रतिक्रिया:

अगदी दयनीय

सर्व पूर्वोत्तर हे आपले बंधू आहेत!

लोक आणि संस्कृतीमधील विविधताबद्दल शिक्षण दिले पाहिजे

दरम्यान, छेत्रीने भारतीय फुटबॉलमध्ये एक महान म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. तो भारतासाठी सर्वाधिक 72 गोल करणारा फुटबॉलपटू आहे. लॉकडाउन सुरू झाल्यापासून एकाधिक इंस्टाग्राम लाइव्ह सत्र केलेला कोहली यावेळी अनेक क्रिकेटपटूंशी बोलला पण चाहत्यांसाठी छेत्रीबरोबर झालेले संभाषणच सर्वांत सर्वोत्कृष्ट ठरले.