London [UK], July 15 (ANI): Serbian Tennis ace Novak Djokovic.

टेनिस पुरुष एकेरीतील बलाढ्य खेळाडू म्हणून गणना होणाऱ्या रोजर फेडरर (Roger Federer) याला पराभवाचा धक्का देत नंबर एक मानांकित नोवाक जोकोविच (Novak Djokovci) यानी यंदाचे विंबलडन (Wimbledon)चे विजेतेपद पटवकावले. फेडरर-जोकोविचमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत सर्बियाच्या टेनिसपटूने 7-6, 1-6, 7-6, 4-6, 13-12 (7-3) असे मोडून काढले. जोकोविचचे हे पाचवे विंबलडन तर एकूण 16 वे ग्रँड स्लॅम जेते पद आहे. फेडररने सिंगल्सचे एकूण 20 ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले आहेत. 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा फेडरर हा पहिला टेनिसपटू आहे. फेडरर मागे 18 ग्रँड स्लॅमसह राफेल नडाल (Rafael Nada) आहे. त्यानंतर जोकोविचने 16. हे दोघे क्रमशः दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांक आहेत.

रोजर स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालला नमवून विंबलडनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाचे विंबलडन फायनल हे फेडेरेरच्या करिअरमधील 12 वे फायनल होते. अंतिम सामन्यात फेडरर आणि जोकोविचने यांनी एकमेकांना चांगला लढा देत चाहत्यांचे मनोरंजन केले.

दरम्यान, महिला ऐकरी सामन्यात सिमोना हालेप हिने अमेरिकेच्या सेरेना विल्यमस हीच पराभव करत आपले पहिले विंबलडन तर एकूण दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. एकतर्फी झालेल्या लढतीत सिमोनाने सेरेनावर 6-2, 6-2 अशी सरळ सेटमध्ये मात केली. सेरेनाने ओपन एरामध्ये सर्वाधिक 23 ग्रँडस्लॅम किताब जिंकले आहेत.