ट्विटरवर अल कायदाचा माजी नेता ओसामा बिन लादेनचा (Osama Bin Laden) कार्डबोर्ड कटआउट एलँड रोडच्या (Elland Road) स्टँडमध्ये दिसल्यावर सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्व खेळ सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत होत असल्याने बर्याच क्लबांनी रिक्त जागा भरण्यासाठी चाहत्यांच्या कटआउटचा तोडगा म्हणून वापर केला आहे. लादेनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लीड्स युनायटेडने (Leeds United) त्वरित कारवाई केली आणि अल कायदाच्या माजी नेत्याचा कटआउट स्टेडियममधून काढून टाकला आहे. दोन-अडीच महिने ठप्प झालेले फुटबॉल हळू-हळू पूर्वपदावर येत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन करून फुटबॉलचे सामने आयोजित केले जात आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना अद्याप परवानगी न दिल्याने त्यांचा फील येण्यासाठी कटआउटचा वापर केला जात आहे. फुलहॅम (Fulham) क्लबविरुद्ध मॅच दरम्यान लादेनचा कटआउट प्रेक्षकांच्या कटआउटसोबत बसवण्यात आला. (प्रेक्षक सीटवर सेक्स डॉल बसवल्याबद्दल FC Seoul क्लबवर दक्षिण कोरिया फुटबॉल लीगने ठोठावला विक्रमी 100 मिलियन वोनचा दंड)
लादेनचा कटआउट पाहून सोशल मीडिया यूजर्स संतापले आणि आपला राग व्यक्त केला. दरम्यान, संपूर्ण वादानंतर लीड्सने माफी मागितली. आता क्लबने असे वचन दिले आहे की 15,000 कार्डबोर्ड प्रेक्षकांमध्ये यापुढे कोणतीही आक्षेपार्ह फोटो राहणार नाहीत. बिन लादेनच्या चेहर्याचा पुठ्ठा आत कसा आला असे बरेच यूजर्स विचार आहेत. यामध्ये सुरक्षेबाबतही ते प्रश्न उपस्थित करत आहेत. टीव्हीवर सामना पाहणार्या दर्शकांना 2011 मध्ये अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यासाठी जबादार असलेल्या लादेनचा कटआउट असल्याचे दिसले.
पाहा यूजर्सच्या प्रतिक्रिया:
अंदाज लावण्याचा खेळ आवडतो?
'Do they have a beard??"
I love a game of Guess Who? pic.twitter.com/uSxNCHOLds
— Bennett Arron (@BennettArron) June 24, 2020
लीड्सच्या प्रेक्षकांमध्ये लादेन
Tremendous effort from whoever actually paid English pounds just to have Bin Laden sit in the Leeds crowd. pic.twitter.com/XhEZd87Vqw
— Elliot Hackney (@ElliotHackney) June 24, 2020
फुटबॉलमध्ये बिन लादेन
Football have Bin Laden. Rugby League has Harold Shipman (in Australia!) pic.twitter.com/KqiihZDl3A
— Phil Newsom (@Newsom_13) June 24, 2020
कर्मचारी ठीक कसे असू शकतात
Bin laden.. how can the staff be ok with displaying that regardless if it was paid for? #lufc #crowdie pic.twitter.com/abpqkBA6Bt
— Seb (@seb_marsden) June 24, 2020
2011 मध्ये पाकिस्तानच्या ऐबटाबाद येथे दहशतवादी संघटना अल कायदाचा ओसामा बिन लादेन याला ठार मारण्यात आले होते. दरम्यान, नॅशनल रग्बी लीग गेममध्ये पेनिथ पँथर्स आणि न्यू कॅसल नाइट्स यांच्यात झालेल्या सामन्यात ब्रिटीश मालिका किलर हॅरोल्ड शिपमनचा एक कटआउट स्टँडमध्ये ब्रिटीश सीरियल किलर हेरोल्ड शिपमनचा कटआउट दिसल्याचे नुकतेच समोर आले होते.