
केवळ मुलेच बाइक उडवू शकतात, मुलींसाठी बाइक चालविणे योग्य दिसत नाही. अशी विचार धारणा असणारे लोकं आपल्या समाजात आहे. त्याच वेळी, बेंगळुरूची रहिवासी ऐश्वर्या पिसे (Aishwarya Pissay) हिने अशा लोकांची विचारसरणी बदलली आहे. ऐश्वर्याला आता लोक बाईक राइडर म्हणून ओळखतात. हंगेरीतील चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीनंतर महिलांच्या गटात एफआयएम वर्ल्ड कप जिंकणारी 23-वर्षीय पिसे मोटारस्पोर्ट्समध्ये जागतिक अजिंक्यपद मिळविणारी पहिली भारतीय ठरली. ऐश्वर्याने ज्युनियर गटात दुसरे स्थान पटकावले होते. पण, ऐश्वर्यासाठी बाइकस्वार बनण्याचा प्रवास इतका सोपा नव्हता.
जेव्हा जेव्हा आपल्या समाजातील एखादी मुलगी काहीतरी वेगळं करण्याचा विचार करते तेव्हा समाज नक्कीच त्यात हस्तक्षेप करतो. जेव्हा ऐश्वर्याला ती बाईकस्वार बनू शकते असे वाटले तेव्हा लोकं बरेच काही बोलू लागले. जसे - बाईक रेसिंग हा मुलांचा छंद आहे. आणि जर रेसिंग दरम्यान तिला दुखापत झाली तर तिचे भविष्य खराब होईल. लोकं म्हणतच राहिले आणि ऐश्वर्या पुढे सरसावत राहिली. ऐश्वर्याने वयाच्या 18 व्या वर्षी बाइक चालविणे शिकले. तिच्या छंदामुळे शर्यतीत तिच्या कॉलरबोनलाही दुखापत केली होती, पण ती थांबली नाही. ऐश्वर्याला तिच्या आईने साथ दिली. ती दर आठवड्याच्या शेवटी आपल्या वरिष्ठांसह बेंगळुरुच्या आसपास बाईकने फिरू लागली आणि याच दरम्यान तिने बाइक चालविणे शिकले.
बाईक घेण्यासाठी ऐश्वर्याने पैसे साठवणे सुरु केले. तिने ड्यूक 200 बाईक विकत घेतली आणि नंतर नियमितपाने बाईक चालविणे सुरू केले. ऐश्वर्याने एमटीव्हीच्या 'चेस द मॉनसून' कार्यक्रमात भाग घेतला होता, ज्यात तिने कच्छच्या रणपासून ते चेरापुंजीपर्यंतचा प्रवास 24 दिवसांत पूर्ण केला. ऐश्वर्याच्या या यशानंतर त्याच्या मित्रांनी साथ दिली आणि प्रशिक्षण घेण्याचा सल्ला दिला. आणि अखेरीस तिने एका रेसिन्ग स्कूलयामध्ये सराव करणे सुरु केले. एक वर्षानंतर तिने पहिल्या रेसमध्ये भाग घेतला. यात तिला पराभवाचा सामना करावा लागला. तिचा असा विश्वास आहे की हा तिच्या रेसिंग कारकिर्दीचा महत्त्वाचा टप्पा होता. फेल झाल्यावर तिने तिच्या सरावाला अजून गंभीरतेने घेतले. तिने प्रशिक्षक जीवा रेड्डी यांना अधिक कठोर प्रशिक्षण देण्यास सांगितले.
दुसरीकडे, कोचसह तिच्या आईने देखील तिची खूप साथ निभावली. ऐश्वर्याने 4 चॅम्पियनशिप (रेड हिमालय 2017, दक्षिण डेअर 2017, इंडियन नॅशनल रैली चॅम्पियनशिप आणि टीव्हीएस अपाचे लेडीज वन मेक चॅम्पियनशिप 2017) चे जेतेपद जिंकले आहेत. ही सर्व जेतेपद जिंकणे हे कोणत्या स्वपना सारखे आहे. जे लोक आधी त्याच्या विरोधात होते ते आता तिचे कौतुक करत आहेत. आज रेसिंग ट्रॅकवरील त्याच्या कठोर परिश्रमाच्या जोरावर ऐश्वर्याने आपली एक ओळख निर्माण केली आहे.