समलैंगिक संबंधात असलेल्या द्युती चंद हिने कुटुंबियांसोबत तोडले नाते, अधर्म करत असल्याची वडिलांनी केली टीका
Sprinter Dutee Chand (Photo Credits-ANI)

भारताची (Indian) धावपटू द्युती चंद (Dutee Chand) हिने काही दिवसांपूर्वी ती समलैंगिक संबंधात असल्याचे म्हटले होते. त्यानंतर घरातील मंडळींनी या संबंधाला विरोध दर्शवला होता. तसेच मोठी बहिण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपसुद्धा लगावला होता. त्याच्यानंतर द्युती हिने समलैंगिक संबंधात येण्यापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंधात असल्याचे म्हटले होते.

मात्र आता ओडिशा मधील गोपालपुर मध्ये राहत असलेल्या द्युती हिने घरातील कुटुंबियांसोबत नाते तोडले आहे. त्यामुळे आता द्युती हिच्या वडीलांनी ती अधर्म करत असल्याची टीका केली आहे. तसेच समाजात द्युती हिच्या समलैंगिक संबंधामुळे कसे वावरणार याची चिंता त्यांना सतावत असल्याचे घरातील मंडळींनी म्हटले आहे.(समलैंगिक संबंधापूर्वी मी एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होती: धावपटू द्युती चंद)

परंतु द्युतीने समलैंगिक असल्याचा खुलासा केल्यानंतर तिचे कौतुक केले जात आहे. मात्र आता गावातील मंडळी त्यांच्या या संबंधाला अमान्य करत असल्याने त्यांना गावात राहणे मुश्किल झाल्याचे बोलले जात आहे.