समलैंगिक संबंधापूर्वी मी एका तरुणासोबत प्रेमसंबंधात होती: धावपटू द्युती चंद
File Photo of Dutee Chand

भारतीय धावपटू (Indian Runner) द्युती चंद (Dutee Chand) हिने ती समलैंगिक संबंधात असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आल. तसेच या समलैंगिक संबंधामुळे घरांच्याचा समोर झुकणार नाही असे द्युती म्हणाली. याच पार्श्वभुमीवर द्युती हिने अजून एक खुलासा केला असून ती समलैंगिंक संबंधापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंधात असल्याचे म्हटले आहे.

2009 मध्ये द्युती हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांचे नाते जवळजवळ पाच वर्ष टिकून असल्याचे द्युतीने सांगितले. तसेट काही कारणामुळे आमच्या दोघांच्या नात्यात फूट पडली असल्याचा खुलासा द्युती हिने केला आहे.(समलैंगिक संबंधात असल्याचे कळल्यावर बहिणीने ब्लॅकमेलिंग करत 25 लाख रुपये मागितले, द्युती चंद हिचा खळबळजनक खुलासा)

तर आता समलैंगिक संबंधात असताना द्युती हिने मला समजून घेणारा आयुष्याचा जोडीदार मिळाला असल्याचे म्हटले आहे. तसेच समलैंगिक संबंधात असलेल्या प्रत्येकाला माझा पाठिंबा असल्याचे द्युतीचे म्हणणे आहे. सध्या मी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची तयार असल्याचे द्युतीने सांगितले आहे.