Sprinter Dutee Chand (Photo Credits-ANI)

भारतीय महिला क्रिडापटू द्युती चंद (Dutee Chand) हिने गेल्या दोन दिवसांपूर्वी आपण समलैंगिक संबंधात असल्याचा खुलासा केला. तसेच भारताच्या इतिहासात प्रथमच एखादी महिला खेळाडू ही समलैंगिक संबंधात असल्याचे समोर आले आहे. द्युती चंद ही सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखले जात असून तिच्या या नात्याबद्दल कौतुक केले जात आहे.

परंतु द्युतीने ती समलैंगिक संबंधात असलेल्या प्रकरणावरुन आता अजून एक खळबळजक खुलासा केला आहे. तिने असे म्हटले आहे, माझ्या मोठ्या बहिणाला जेव्हा कळाले की समलैंगिक संबंधात आहे. तेव्हापासून ती मला ब्लॅकमेलिंग करत असून माझ्याकडून चक्क 25 लाख रुपयांची खंडणीसुद्धा मागितली आहे. त्याचसोबत एकदा बहिणे याबद्दल मारहाण केल्याने मी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार सुद्धा केली होती. मात्र या समलैंगिक नाते अखेर मला समोर आणावे लागले आहे असे द्युतीने आपले स्पष्टीकरण दिले आहे.(भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकप्रिय महिला खेळाडूने दिली लेस्बियन असल्याची कबुली; महिलेसोबतच्या नात्याचाही खुलासा)

मात्र घरातल्यांच्या धमक्यांना मी घाबरणार नसल्याचे द्युतीने म्हटले आहे. त्यामुळे मी कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे ही द्युतीचे म्हणणे आहे. तर भारतामध्ये गेल्यावर्षी सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारे कलम 377 (Section 377) रद्द ठरवत, एक ऐतिहासिक निकाल दिला. एलजीबीटीक्यू (LGBTQ) लोकांसाठी हा दिलासादायक निर्णय होता. परंतु अजूनही समाजाची मानसिकता याबाबत बदलली नाही.