FIFA World Cup 2022: माजी मिस क्रोएशिया आक्षेपार्ह ड्रेस घालून सामना पाहण्यासाठी पोहोचली, आता होऊ शकतो दंड
Miss Croatia (Photo Credit - Instagram)

FIFA World Cup 2022: फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) स्पर्धेचा उत्साह सध्या वाढत आहे. अनेक छोट्या संघांनी आपल्या स्फोटक खेळाने अनेक बड्या दिग्गजांची बोलती बंद केली आहे. कतारच्या या भव्य कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुकही होत आहे. पण तिथले कडक नियम आणि कायदे अनेकजण मान्य करायला तयार नाहीत. या स्पर्धेमध्ये मध्ये माजी मिस क्रोएशिया आणि मॉडेल इव्हाना नॉल (Ivana Knoll) सध्या चर्चेत आली आहे. कारण म्हणजे ती आक्षेपार्ह ड्रेस परिधान करून सामना पाहायला गेली होती. आता त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे बोलले जात आहे.

कतारच्या कायद्यानुसार आक्षेपार्ह ड्रेस

इव्हाना क्रोएशिया मोरोक्कोविरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी अल-बायत स्टेडियममध्ये गेली होती. तिने तिच्या देशाच्या आयकॉनिक लाल आणि पांढर्या पॅटर्नमध्ये कपडे घातले होते. मात्र कतारच्या कायद्यानुसार हे कपडे योग्य नव्हते. हे नियमांचे स्पष्ट उल्लंघन असून मॉडेलला तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागू शकते, असे बोलले जात आहे. (हे देखील वाचा: Massive Fire Breaks Out Near FIFA World Cup City: फिफा विश्वचषक सुरु असलेल्या कतारमधील लुसेल शहरानजीक फॅन गावास भीषण आग, धुरामुळे आकाशात काळोखी)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ivana Knöll (@knolldoll)

कतारच्या नियमांचे केले उल्लंघन

"पुरुषांनी तसेच महिलांनी सार्वजनिक ठिकाणी उत्तेजक कपडे घालणे टाळावे आणि स्थानिक संस्कृतीचा आदर करणे अपेक्षित आहे," असे कतार पर्यटन प्राधिकरणाने विश्वचषकापूर्वी सांगितले. “सामान्यत: पुरुष आणि स्त्रियांना त्यांचे खांदे आणि गुडघे झाकलेले आहेत याची खात्री करण्याची शिफारस केली जाते, परंतु आता असे म्हटले जात आहे की मॉडेल इव्हानाने सर्व नियमांचे उल्लंघन केले. असे मानले जाते की नॉलला सभ्यतेचे कायदे मोडण्यासाठी अधिक गंभीर दंड भोगावा लागेल. फिफा विश्वचषकादरम्यान उघड कपडे परिधान केल्याबद्दल तिला तुरुंगवासही होऊ शकतो. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.