रविवारी झालेल्या (IPL 2022) मॅच मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 7 गडी राखून पराभव केला. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जला (Cheenai Super Kings) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही संघांनी या मोसमात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. मुंबई आणि चेन्नई (Mumai And Chennai) यांच्यात आतापर्यंत 4-4 सामने झाले असून चारही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई आणि चेन्नईच्या पराभवानंतर युजर्सनी सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. यासोबतच अनेक मीम्सही व्हायरल होत आहेत.
शनिवारी हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 154 धावा केल्या. यादरम्यान मोईन अलीने 48 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात हैदराबादने अभिषेक शर्माच्या 75 धावांच्या शानदार खेळीच्या मोबदल्यात 17.4 षटकांत सामना जिंकला.
Tweet
MI & CSK fans ryt now 😅 pic.twitter.com/EA2nRXgTUd
— ( 𝒯𝓊𝓇𝓀 ) محمد سرفراز🖤 (@sarfarazturki33) April 9, 2022
Csk and Mi fans rn 😭🤏🏻😎#RCBvMI pic.twitter.com/lGF4m3n5BN
— Vansh (@FarziTroll) April 9, 2022
MI and CSK !! #MumbaiIndians #RCBvMI #CSK𓃬 #MIvRCB #MI #IPL2022 pic.twitter.com/X6YIdSiQfA
— sᴀʜɪʙᴅᴇᴇᴘ sɪɴɢʜ (@sahibdeep_1) April 9, 2022
#Csk and #Mi situation this season 😂#IPL2022 #ViratKohli𓃵 #RCBvMI #CSKvSRH pic.twitter.com/dg8ZGzISPw
— SPACE RECORDER 💥 (@Spacetrollers) April 9, 2022
दुसरीकडे, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 151 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 68 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. प्रत्युत्तरात बंगळुरूने १८.३ षटकांत सामना जिंकला. बंगळुरूकडून अनुज रावतने अर्धशतक झळकावले. त्याने 66 धावा केल्या. त्याचबरोबर माजी कर्णधार विराट कोहलीने 48 धावांचे योगदान दिले. (हे देखील वाचा: पर्पल कॅप शर्यतीत फिरकी गोलंदाजांचा जलवा, उमेश यादवच्या वर्चस्वाला ‘या’ स्टायलिश विदेशी खेळाडूकडून धोका; पहा संपूर्ण लिस्ट)
मुंबई आणि चेन्नईला सलग 4 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी दोन्ही टीमला खूप ट्रोल केले.