FIFA World Cup trophy (Photo credit: Wikipedia)

फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) स्पर्धेला कतारमध्ये आजपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा पहिलाच सामना यजमान कतार आणि इक्वाडोर यांच्यात रात्री 9:30 वाजता होईल. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी लुसेल स्टेडियमवर (Lusail Stadium) खेळवला जाईल. तत्पूर्वी अल बायत स्टेडियममध्ये आयोजित उद्घाटन समारंभ पार पडेल. स्टेडीयममध्ये या उद्घाटनास साधारण 60,000 लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्टेडीयमची क्षमताही एकाच वेळी 60,000 लोक उपस्थित राहतील इतकी आहे. या उद्धाटन सोहळ्याचे आणि स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण अथवा लाईव्ह स्ट्रिमिंग आपण पाहू शकता. हे थेट प्रक्षेपण आणि लाईव्ह स्ट्रिमींग आपण कोठे पाहू शकता? हे इथे घ्या जाणून.

FIFA विश्वचषक 2022 चा उद्घाटन सोहळा रविवार, 20 नोव्हेंबर रोजी अल बायत स्टेडियमव (Bayt Stadium) होणार आहे. उद्घाटन सोहळा IST संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. (हेही वाचा, FIFA World Cup Final: फिफाकडून अभिनेता Ranveer Singh ला निमंत्रण; वर्ल्ड कप फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व)

FIFA विश्वचषक 2022 उद्घाटनाचे थेट प्रक्षेपण

FIFA विश्वचषक 2022 च्या उद्घाटन समारंभाचे प्रसारण Sports18 आणि Sports18 HD TV वर केले जाईल.

FIFA विश्वचषक 2022 उद्घाटनाचे लाईव्ह प्रक्षेपण

FIFA विश्वचषक 2022 चा उद्घाटन सोहळा जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीम केला जाईल.

टीप- वर दिलेल्या टेलिकास्ट व स्ट्रीमिंगच्या वेळा होस्ट ब्रॉडकास्टरकडून मिळालेल्या माहितीनुसार आहेत. त्यामध्ये काही कारणास्तव बदल होऊ शकतो.