Australian Open 2021: कोरोना काळात क्रिकेट आणि फुटबॉलबरोबरच इतर खेळही सुरु होऊ लागले आहेत. वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनची (Australian Open) आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या तारखांवर (Australian Open Dates) शिक्कामोर्तब झाला आहे. ATP टूरने जाहीर केलेल्या अपडेटेड माहितीनुसार स्पर्धा पुढच्या वर्षी त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा 3 आठवडे उशिराने खेळली जाईल. ATP ने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून मेलबर्नमध्ये (Melbourne) खेळली जाईल, तर फायनल 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केले जाईल. वर्षाच्या पहिल्या ग्रेड स्लॅमचा मुख्य ड्रॉ 18 जानेवारीपासून सुरू होईल. एटीपीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की ऑस्ट्रेलियन ओपनसाठी पुरुषांची पात्रता स्पर्धा डोहा (Doha) येथे 10 ते 13 जानेवारी दरम्यान आयोजित केली जाणार आहे. शिवाय, ग्रँड स्लॅमसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना मेलबर्नला जाण्यापूर्वी क्वारंटाइन रहावे लागेल. (FIFA 2021 U-17 Women's World Cup: भारतात होणारी अंडर-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द, FIFA कडून 2022 स्पर्धेचे यमजानपद बहाल)
ऑस्ट्रेलियन ओपन 18 जानेवारी रोजी सुरू होणार होते, मात्र ते तीन आठवड्यांच्या विलंबामुळे खेळाडूंना मेलबर्न येथे प्रवेश करून क्वारंटाइन राहणे आणि आणि 2 एटीपी 250 स्पर्धांसाठी तयारी करता येईल. "ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांची पात्रता डोहा येथे 10 ते 13 जानेवारी दरम्यान होईल आणि त्यानंतर 15 ते 31 जानेवारीनंतर मेलबर्नला जाणाऱ्या सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांना प्रवासाची आणि 14 दिवस क्वारंटाइन राहण्याची मुदत दिली जाईल," ATPने आपल्या निवेदनात म्हणले. नोवाक जोकोविच आणिसोफिया केनिनमेलबर्नमध्ये विजेतेपदाचा बचाव करण्यासाठी उतरतील.
The ATP has today announced an update to the 2021 ATP Tour calendar, outlining a revised schedule for the first seven weeks of the season.
— ATP Tour (@atptour) December 17, 2020
दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपन अधिकारी मेलबर्नमधील हंगामातील पहिल्या ग्रँड स्लॅमसाठी 25 ते 30 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थतीची अपेक्षा करत आहे. पण देशातील कोविड-19 परिस्थिती नियंत्रणात असल्याने अधिकाधिक प्रेक्षकांना उपस्थति राहण्याची परवानगी शक्यता आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे 2021 मध्ये सुमारे 3 एटीपी 250 स्पर्धा आयोजित होणार नसल्याची पुष्टी केली गेली. त्यामध्ये एएसबी क्लासिक (ऑकलंड) आणि न्यूयॉर्क ओपनचा समावेश आहे, तर टाटा महाराष्ट्र ओपन (पुणे) फेब्रुवारी आठवड्यात ठरलेल्या टप्प्यात होण्यास अनपेक्षित आहेत.