कोरोना व्हायरस (Coronavirus) आजार असे पर्यंत पुढील वर्षीही ऑलिम्पिकचे (Olympics) आयोजन करणे अशक्य आहे असे जपानचे पंतप्रधान शिंजो अबे (Shinzo Abe) यांनी सांगितले. कोविड-19 (COVID-19) च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगाला धक्का देत आयओसीने बहु-राष्ट्रीय कार्यक्रमाच्या 2020 च्या आवृत्तीला 2021 पर्यंत पुढे ढकलले. ऑलिम्पिकशी संबंधित प्रश्नाचे उत्तर देताना आबे म्हणाले की, सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांना सुरक्षित वाटणे महत्वाचे आहे आणि तसे होण्यासाठी व्हायरस नसणे आवश्यक आहे. साथीच्या रोगाचा जगभरात होणारा संसर्ग दर दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि लसची निर्मित अजून फारच बाकी असल्याने या खेळांना अजून काही काळासाठी स्थगित दिली जाऊ शकते का असे प्रश्न सध्या विचारले जात आहे. प्रधानमंत्री अबे म्हणले की, "ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे संपूर्ण स्वरूपात आयोजन केले जाणे आवश्यक आहे, त्यामध्ये खेळाडू आणि प्रेक्षक सर्व सुरक्षितपणे सहभागी होऊ शकतात असे आम्ही म्हणत आहोत. कोरोना व्हायरस महामारी मात मिळवल्याशिवाय खेळांना अशा संपूर्ण प्रकारात आयोजित करणे अशक्य आहे.” (टोकियो ऑलिम्पिक स्थगित झाल्याने IOC ला होणार कोट्यवधींचे नुकसान, अध्यक्ष थॉमस बाच यांनी दिली माहिती)
रोगामुळे पुढच्या वर्षी टोकियो खेळ आयोजित करू शकेल की नाही हे विरोधी पक्षाच्या खासदाराच्या एका प्रश्नाला प्रधानमंत्री अबे उत्तर देत होते. टोकियोने मंगळवारी 112 नवीन संक्रमणांची पुष्टी केली, असे राष्ट्रीय प्रसारक एनएचके यांनी सांगितले. बुधवारच्या रुग्णांची संख्या अद्याप उपलब्ध नाही. एनएचकेच्या म्हणण्यानुसार जपानमध्ये 13,895 जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहेत ज्यात 413 मृत्यूंचा समावेश आहे. दरम्यान, यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकच्या प्रमुखांनी यापुढे विलंब झाल्यास हा कार्यक्रम रद्द करावा लागेलअसा इशारा दिला होता. "अशा परिस्थितीत ऑलिम्पिक रद्द होईल,"आवश्यक असल्यास खेळ आणखी पुढे ढकलण्याविषयी विचारले असताना योशिरो मोरीने निकन स्पोर्ट्सला सांगितले.
मंगळवारी जपान मेडिकल असोसिएशनचे प्रमुख (जेएमए) योशिताके योकोकुरा यांनी एक न्यूज ब्रिफिंगमध्ये सांगितले की “प्रभावी लस तयार केल्याशिवाय ऑलिम्पिकचे आयोजन करणे अवघड होईल” असे मला वाटते. दरम्यान यंदा जुलै-ऑगस्टमध्ये टोकियो ऑलिम्पिक होणार होती पण कोविड-19 च्या संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) पुढील वर्षी 23 ऑगस्ट पर्यंत 23 जुलै तारखा निश्चित केल्या आहेत.