Athletes | Photo Credits: Pixabay.com

Central Board of Secondary Education अर्थात सीबीएसई कडून 2025 मध्ये जे नॅशनल आणि इंटरनॅशनल स्पोर्ट्स इव्हेंट मध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये Olympiads मध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचा समावेश यामधील सुवर्णमध्य साधण्यासाठी ही विशेष सोय करण्यात आली आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या CBSE बोर्ड परीक्षेच्या तारखा भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) किंवा बोर्ड ऑफ क्रिकेट कंट्रोल इन इंडिया (BCCI) द्वारे मान्यताप्राप्त क्रीडा स्पर्धा सोबत येत आहेत त्यांना या तरतुदीचा फायदा होऊ शकतो. यात या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेल्या प्रवासाच्या तारखा देखील समाविष्ट आहेत. हे धोरण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये स्पर्धा मध्ये सहभागी विद्यार्थ्यांसाठी आहे.

CBSE चा हा निर्णय भारताच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे बोर्डाच्या परीक्षेदरम्यान क्रीडा किंवा शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. नक्की वाचा:  CBSE Board Exam Date Sheet 2025: सीबीएससी बोर्डाने जाहीर केल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा; पहा वेळापत्रक .

कोणत्याही विद्यार्थ्याचे देशासाठी प्रतिनिधित्व केल्यामुळे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची यामुळे खात्री होणार आहे. अधिक तपशीलांसाठी, विद्यार्थी त्यांच्या शाळांशी संपर्क साधू शकतात किंवा अधिकृत CBSE वेबसाइटला भेट देऊ शकतात. यंदांच्या परीक्षांसाठी शाळांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण अर्ज CBSE कडे पाठवणे आवश्यक आहे. मूळ वेळापत्रकाच्य 15 दिवसांच्या आत परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा केले जाईल. CBSE ची प्रादेशिक कार्यालये 15 जानेवारी 2025 पर्यंत शाळांना मान्यता कळवणार आहेत.