Pooja Rani (Photo Credits: File Image)

Asian Boxing Championships: एशियन बॉक्सिंग चँम्पीयनशीप 2019(Asian Boxing Championships)मध्ये भारताच्या दोन खेळाडूंनी सूवर्णविजेती कामगिरी केली आहे. अमित पंघल याच्या रुपात भारताला पहिले सूवर्ण पदक मिळाले. तर पूजा राणी हिच्या रुपाने भारताने दुसऱ्या सूवर्ण पदकावरही आपले नाव कोरले. अमित पंघल याने 52 किलो ग्रॅम वजन गटात दक्षिण कोरियाई बॉक्सर किम इनकू याला धुळ चारली. कोरियासोबतचा हा सामना भारताने 5-0 असा अशा लढतीने एकतर्फी जिंकला. तर, पूजा राणी हिने 81 किलो ग्रॅम वजन गटात विश्वविजेत्या वांग लिना हिच्यावर आघाडी घेत गोल्ड मेडल मिळवले.

भारतीय महिला खेळाडूंची पुरुषांच्या बरोबरीने पदकांची कमाई

एशियन बॉक्सिंग चँम्पीयनशीप मध्ये भारताने एकूण दोन सूवर्ण पदकांसोबतच इतर 13 पदकं जिंकली. यात एका सूवर्ण पदकासंह इतर 7 पदकं पुरुष खेळाडूंनी तर, एका सूवर्ण पदकांसह इतर 6 महिला खेळाडूंनी जिंकत बरोबरी साधली आणि देशाला 13 पदकं मिळवून दिली. दरम्यान, या स्पर्धेत भारताने 13 पैकी 6 बॉक्सर अमित पंघल, कविंदर सिंह बिष्ट, दीपक सिंह, आशीष कुमार, पूजा रानी आणि सिमरनजीत कौर फाइनल पर्यंत पोहोचले होते. अमित आणि पूजा सोडून इतर कोणताही भारतीय खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान मोडीत काढू शकला नाही.

India_AllSports ट्विट

India_AllSports ट्विट

दीपक सिंह याने जिंकले रौप्य पदक

दीपक सिंह याने 49 किलो ग्रॅम वजन गटात रौप्य पदक (Silver Medal) मिळवले. दीपकला फायनलमध्ये हार पत्करावी लागल्याने त्याला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. फायनलमध्ये त्याचा सामना उज्बेकिस्तान देशाचा खेळाडू नोदिरजोन मिर्जाहमेदोव याच्यासोबत झाला. मिर्जाहमेदोव याने सूवर्ण पदक जिंकले.

भारती महिला बॉक्सरने जिंकले कास्य पदक

माजी चँम्पीयन एल सरिता देवी हिने 60 किलो ग्रॅम वजन गटात, मागील वेळी रौप्य पदक जिंकणार्या मनीषा हिने 54 किलो वजनी गटात, माजी ज्यूनियर वर्ल्ड चँम्पीयन निखत जरीन हिने 51 किलो ग्रॅम आणि वर्ल्ड चँम्पीयनशीप मध्ये देशासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या सोनिया चहल हिने 57 किलो वजनी गटात ब्रॉन्ज मेडल जिंकले.

अमित पंघल दुसऱ्यांदा सूवर्ण पदक विजेता

अमति पंघल याने जिंकलेले हे दुसरे सूवर्ण पदक आहे. त्याने फेब्रुवारीमध्येच बुल्गारिया येथे झालेल्या स्ट्रँडजा मेमोरियल टूर्नामेंटमध्ये सूवर्ण पदक जिंकले होते. पंघल याने गेल्या वर्षी जकार्ता येथे झालेल्या एशियाई खेळामध्येही सूवर्ण पदक जिकेले आहे.